आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bus Accident Near Pushkar Valley News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाप रे... थोडक्यात बचावले प्रवासी, पुष्कर घाटीत स्टेयरिंग फेल, 72 प्रवासी सुखरुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (राजस्थान)- अजमेर आगारातून निघालेली 72 प्रवाशांना घेऊन जात असलेली बस पुष्कर घाटीत थोडक्यात बचावली. स्टेयरिंग फेल झाल्याने बस अनियंत्रित झाली. त्यानंतर ही बस खोल घाटी आणि रस्त्याच्या अगदी मधोमध असलेल्या सुरक्षा भींतीवर अडकून पडली. बस जर घाटीत कोसळली असती तर मोठी प्राणहानी झाली असती.
नसीराबादला जाण्यासाठी सकाळी 11 वाजता बस निघाली होती. नौसर मंदिरासमोर बसच्या स्टेयरिंगचा रॉड निघाला. त्यामुळे बस अनियंत्रित झाली. बस चालक अदयसिंह यांनी प्रसंगावधान राखत बसला वळवले. तरीही बस घाटी आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सुरक्षा भींतीवर कोसळली. सुदैवाने बस खोल घाटीत पडली नाही. यावेळी बस काही काळासाठी घाटीच्या दिशेने झुकली होती. प्रवाशांमध्ये एकच कल्लोळ माजला होता. पण अखेर ती सुरक्षा भींतीवर टिकून राहिली. त्यानंतर एका एका प्रवाशाला सावधानतेने बसखाली उतरवण्यात आले. काही प्रवासी खिडकी मार्गाने बाहेर आले.
श्वास रोखून पुढील स्लाईडवर बघा, थोडक्यात बचावलेल्या बसचे फोटो....