आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्‍थान: चालक खात होता गुटखा; बसचा सुटला ताबा, अपघातात 7 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजस्थानमधील टोंक जिल्‍ह्यातील देवळी पोलिस स्‍टेशनच्‍या अंतर्गत येणा-या मार्गावर एक बस पलटून झालेल्‍या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. तर, 40 पेक्षा अधिक जण जखमी असल्‍याची माहिती आहे. बसच्‍या छतावर काही परीक्षार्थी बसले होते. वनरक्षकाची परीक्षा देऊन ते घरी परतत होते. अपघात झाला तेव्‍हा चालक गुटखा खाण्‍यात गुंतला होता अशी माहिती मिळाली आहे.
कोटा आगाराची ही बस जयपुरवरून कोटा येथे जात होती. देवळी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत अचानक बस चालकाचा ताबा सुटला नि बस पलटी झाली. अशी माहिती मिळाली आहे. घटनास्‍थळावर उपस्‍थित पोलिस उपनिरीक्षक उदयलाल यांनी माहिती दिली की, जयपूर येथून येणारी बस देवळीजवळ असलेल्‍या धूनी गावाजवळ पलटली. जखमींना तत्‍काळ देवळीच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. अपघातातील मृतकांची ओळख पटवण्‍यात येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अपघाताचे फोटो...