Home | National | Rajasthan | Cbse Students Database Leak Updates

CBSE ते JEE मेन च्या 11 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लिक, अडीच लाखांत विकली गेली माहिती...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2017, 05:22 PM IST

यावर्षी जेईई मेन्समध्ये देशातील 11 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा सीबीएसईकडून लिक झाला आहे. हा डेटा बाजारात बेकायदेशीरपणे विकला जात आहे.

 • Cbse Students Database Leak Updates
  कोटा- यावर्षी जेईई मेन्समध्ये देशातील 11 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा सीबीएसईकडून लिक झाला आहे. हा डेटा बाजारात बेकायदेशीरपणे विक्री केला जात आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, पिन कोड आदी. माहिती मार्केटमध्ये विक्रीसाठी दिली आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अॅप्लिकेशनमध्ये भरलेली आहे. शिक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

  एका राज्याच्या माहितीसाठी 57 हजार रुपयांची मागणी..
  -पुढील plus2jee.datadesk.in वेबसाइटच्या माहितीवरून हा डेटा व्रिकीसाठी उपलब्ध केला जात आहे. वेबसाईट्सवर दोन नंबर दिले आहे. या नंबरावर प्रवीण चौधरी या व्यक्तीशी संपर्क साधला.
  - या व्यक्तीने एक राज्याची माहिती देण्यासाठी 57 हजार रुपयांची मागणी केली.
  रिपोर्टर - मेन्सच्या माहितीचा रेट काय आहे?
  चौधरी- एका राज्याचे 57 हजार रुपये घेईल.
  रिपोर्टर - किंमत तर खूपच जास्त आहे.
  चौधरी- ऑल इंडिया डेटा 2.30 लाख रुपये लागतील. रेट फिक्स आहे, यामध्ये एक रुपयासुध्दा कमी होणार नाही.
  रिपोर्टर - पैसे कसे द्यावयाचे?
  चौधरी- तुम्ही ईच्छूक असाल तर मी तुम्हाला आईसीआईसीआई बँकेचा अकाऊंट नंबर पाठवतो.

  रिपोर्टरने 6 विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता वेबसाईट्सचा दावा चेक केला... ​
  राजस्थान आणि उत्तरप्रदेशच्या यादीमधील 6 विद्यार्थ्यांची माहिती घेतली. बुंदीमधील लक्ष्मी, बारां येथील निखिल आणि हनुमानगढचां घनश्याम यांच्याशी संपर्क केला असता तिघांच्या मोबाईलवर त्यांच्या वडिलांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी जेईई मेनची परीक्षा दिली आहे आणि तुम्ही दिलेली माहितीसुद्धा सत्य आहे. याशिवाय इलाहाबादचा हिफजान हसीब अन्सारीशी बोलणे झाले असता त्याला सांगितलेली माहिती बरोबर असल्याचे तो म्हणाला. तसेच बरेलीची ऊर्जा आणि आग्राची काजल खान यांच्याशीसुद्धा फोनवर बोलणे झाले.

  सीबीएसईचे पीआरओ अधिकारीसुध्दा अचंबित....
  - रिपोर्टरने या विषयामध्ये सीबीएसई दिल्लीच्या पीआरओ रमा शर्माशी बोलणे झाले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला की असे कसे झाले. रमा शर्मा म्हणाल्या की माहिती घेतल्यानंतरच या विषयावर बोलेल की असे का झाले. यानंतर रिपोर्टरने आपले कर्तव्य निभावले आणि त्यांना वेबसाईटची लिंक पाठवली.
  बँकेत जमा करायला सांगतात पैसे: एकाच वेळेस पासवर्ड मिळतो.
  रिपोर्टरनी प्रवीण चौधरीला विचारले की डेटा बरोबर आहे का याची काय गॅरंटी? त्याने वेबसाइट्सची लिंक दिली आणि म्हणाला चेक करून घ्या. विश्वास असेल तर पुढील विषावर बोलणे करू असे चौधरी म्हणाला.
  - साईटवर गेल्यानंतर राज्यांची यादी येते. कोणत्याही राज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव दुसरी माहिती दिसेल. परंतु मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी नाही दिसणार. विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर हवा असेल तर तुमचा मोबाइल क्रमांक मागितला जातो. आणि त्यावर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड ) दिला जातो. या ओटीपीला सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. यादीतील कोणत्याही तीन विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांकावर क्लिक करा आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर ओपन होतील.

 • Cbse Students Database Leak Updates

Trending