जयपूर- गोपालपूरा बायपासवर गजसिंहपूराजवळ रात्रीच्या सुमारास सेंट्रल अॅकॅडमी ग्रुपचे संचालक अनुराग मिश्र यांची आलिशान कार अनियंत्रित होऊन रोड डिव्हायडरला जोरदार धडकली. त्यानंतर कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येत असलेल्या ट्रेलवर आदळली. या भयंकर दुर्घटनेत 38 वर्षिय अनुराग यांचा मृत्यू झाला. दुर्घटना घडली तेव्हा कारमधील एअर बॅग उघडली गेली होती. परंतु, तरीही अनुराग यांचा जीव वाचला नाही. सुमारे अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर अनुराग यांचा मृतदेह दोऱ्या बांधून कारबाहेर काढण्यात आला. त्यांच्या मोबाईलमधील जस्ट डायल क्रमांकांवर फोन करून पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील निर्माणनगर एव्हरेस्ट विहार कॉलनीचे रहिवासी अनुराग मिश्र रात्रीच्या सुमारास सुमारे दिड वाजता भांकरोटा येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम बघून घरी परत येत होते. गोपाळपूरा बायपासपासून गजसिंहपूराकडे जाणाऱ्या वळणावर त्यांची कार रोड डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. तिथे तिने दुसऱ्या बाजूने येत असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनुराग यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळाचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...