आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी, मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी मधान्य भोजनाची घेतली चव, मारला गावाचा फेरफटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी डुंगरपूर जिल्ह्यातील हिराता येथील सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी मध्यान्य भोजनाची चव घेताना राजे.)

उदयपूर (राजस्थान)- सरकार आपके द्वार या कार्यक्रमात संभाग येथील 23 पंचायत समितींमधील सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी राजस्थानच्या महाराणी आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी डुंगरपूर जिल्ह्यातील हिराता येथील सरकारी शाळेला भेट दिली. या शाळेतील मध्यान्य भोजनाची चव चाखली.
त्यानंतर सागवाडा येथे जनसुनावणी झाली. यावेळी वसुंधरा राजे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. सरकारी योजनांच्या नावाखाली जनतेसोबत गंमत करु नका, असे बजावले. तुम्ही योग्य पद्धतीने काम केले असते तर जनसुनावणीला एवढी अलोट गर्दी झाली नसते, असेही सांगितले.
पुढील स्लाईडवर बघा, येथील महाराणी आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचा साधा अवतार.... ग्रामस्थांसोबत केली गावाची पाहणी... शाळेतील मुलांसोबत साधला संवाद....