आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्‍या त्रासाला कंटाळून चिमुरड्याची अात्‍महत्‍या, वाचा त्‍याची सुसाईड नोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्‍थानच्‍या सिरोही जिल्‍ह्यातील पलंडी मोरली गावातील 'बाल विद्या मंदिर' खाजगी शाळेतील 12 वर्षाच्‍या जिगर रावल नावाच्‍या चिमुरड्याने शिक्षकांकडून वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन अात्‍महत्‍या केली.
चिमुरड्याने लिहलेली सुसाईड नोट प्रत्‍येकाचे मन हेलाऊन सोडणारी आहे. माझ्याकडून दिवाळीच्‍या सुट्यामध्‍ये होमवर्क पूर्ण झाले नाही. होमवर्कचे कारण पुढे करत शिक्षक मला 15 दिवसापासून वारंवार मारत असल्‍याची तक्रार रावलने सुसाईड नोट मध्‍ये केली आहे.
रावलने सुसाईड नोटमध्‍ये या कृत्‍याबद्दल माफी मागितली आहे. याबरोबर माझ्या सारखे चुकेची पाऊल न उचलता तुम्‍ही आई-वडीलांना खाली पाहावे लागेल असे कोणतेही कृत्‍ये करू नका असा सल्‍ला आपल्‍या भावडांना दिला आहे. याबरोबच शाळेमध्‍ये मद्य पिणारे शिक्षक विद्यार्थ्‍यांना विनाकारण शिवीगाळ करत असल्‍याचे रावलने म्‍हटले आहे.
घटनेचा गावक-यांकडून निषेध-
पोस्‍टमार्टमसाठी मुलाचे प्रेत नेण्‍यासाठी आलेल्‍या पो‍लिसांना गावक-यांनी विरोध केला. जो पर्यंत गुन्‍हेगार आटक होत नाहीत तोपर्यंत प्रेताला हात लाऊ दिला जाणार नाही अशी भूमिका गावक-यांनी घेतली.
संचालकासह तिन शिक्षक पोलिसांच्‍या ताब्‍यात-
बाल विद्या मंदिराचे संचालक सुमेरसिंग, शिक्षक ताराराम व भरत कुमार यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा चिमुरड्याने लिहलेली सुसाईड नोट...