आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीलच कापतात बाळाची नाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर-गर्भवती महिलांची प्रसूती सुलभ व्हावी आणि त्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी एक नवा ट्रेंड रूढ होताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रुग्णालयांमध्ये मूल जन्माला येण्याच्या घटनेकडे एक फेस्टिव्हल म्हणून पाहिले जात आहे. यासाठी लेबर रूममध्ये महिलेला दाखल केल्यापासून ते मूल जन्मास येईपर्यंत पतीची उपस्थिती असते आणि तो वेदनेप्रती सहानुभूती दाखवत असतो. इतकेच नाही तर मुलाची गर्भनाळही खुद्द जन्मदाता पिता कापत आहे. यामुळे पित्याचे भावनिक नाते दृढ व्हावे, अशी संकल्पना आहे.
याशिवाय प्रसूती वेदनाविरहीत आणि तणावमुक्त करण्यासाठी वॉटर बर्थिंग (पाण्यात प्रसव) तंत्र सुरू झाले आहे. कोमट पाण्यात प्रसूती केल्याने महिलेला कमी वेदना होतात. शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लेबर रूममध्ये पतीच्या उपस्थितीचा ट्रेंड केवळ विदेशात होता. आता भारतात मोठय़ा शहरांमध्येही हा ट्रेंड सुरू झाला आहे.
गर्भनाळ कापण्यासाठी ट्रेनिंग
6 ते 8 महिन्यांची गर्भवती असणार्‍या महिलेच्या पतीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येते. डॉ. स्मिता दसेरा यांनी सांगितले की आतापर्यंत महिलेला एकटीलाच वेदना सहन कराव्या लागत असत. आता पती महिलेला मसाज आणि ब्रीदींगमध्ये मदत करू लागले आहेत. नाळ कापण्याचे प्रशिक्षण पित्यांना देण्यात येत आहे.
पतीला परवानगी का ?
फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. स्मिता वैद्य यांनी सांगितले की, महिलांमध्ये प्रसूती वेदनेची खूप भीती असते. यामुळेच पतीला लेबर रूममध्ये थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. पित्याची उपस्थिती अधिकाधिक असावी आणि सकारात्मक नाते दृढ व्हावे, यासाठी पित्याकडून मुलाची नाळ कापली जात आहे.
डिलेव्हरीचे नवीन प्रकार
शेवटच्या तीन चार तासाच्या लेबरमध्ये महिलेला संमोहित करून वेदना नियंत्रित करण्यात येतात.
वॉटरबर्थ तंत्र : महिलेला बाथ टबमध्ये ठेवून प्रसूती करण्यात येते. मूल पाण्यातून निघून पाण्यात येतं. याने आईचा स्ट्रेस लेव्हल कमी होऊन मूल हेल्दी बनते. साधारण डिलेव्हरीत मूल पाण्यातून (गर्भाशय) थेट हवेत येतं. गर्भसंस्कार अंतर्गत तीन ते सात महिन्यांच्या काळात मंत्र म्हटले जातात.