आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Completing 1 Year Of Vasundhra Government Rajasthan

सामान्यांच्या CM वसुंधरा राजे, झोपडीसमोर पोत्यावर बसून घेतला जेवणाचा आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपुर - राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची लोकप्रियता आपल्याला पावला-पावलावर पाहण्यास मिळते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर वसुधरा राजेंच्या रॅलिमध्ये अनेक लोक त्यांचे समर्थन करताना आपल्याला दिसतात. तर सोशल साइट्सवर देखील त्या इतर नेत्यांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एप्रिल 2014 मध्ये अजमेर येथे झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान वसुंधरा यांचे स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षाव करण्यात आला होता.
...जेव्हा एका मुलासोबत बसून घेतले मिड-डे मील

'शासन तुमच्या दारी' या कार्यक्रमाअंतर्गत वसुंधरा राजे यांनी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांत जावून लोकांच्या भेटी घेतल्या त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. जेव्हा मुख्यमंत्री खण्डार तहसीलच्या फरिया गावामध्ये पोहचल्या त्यावेळी तेथील अमरा गुर्जर यांनी त्यांना आपल्या घरी भोजन करण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देत वसुंधरा राजे त्यांच्या घरी गेल्या. येथे त्यांनी खुल्या अंगणात असलेल्या चुलीजवळ बसून बाजरीची भाकरी, दाल, दही, गुळ, धन्याची चटनी या पदार्थांची चव पोत्यावर बसून घेतली. यावेळी चुलीवर पोळी बनवत असलेल्या बल्लू व रूमाली या महिलांशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या.

यानंतर त्या भरतपुर संभाग येथे एका जन सुनवणीमध्ये सहभागी झाल्या यावेळी तेथील एका शाळेमधील विद्यार्थ्यांचा एका शिक्षिकेप्रमाणे त्यांनी क्लास घेतला. येथे त्यांनी मुलांच्या पंगतीमध्ये बसून मिड-डे मीलचा आनंद घेतला.

फेसबुकवर सर्वात आघाडीवर
इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेने वसुंधरा राजे फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांपेक्षा त्यांच्या फेसबुक पेजला सर्वात जास्त लाईक्स आहेत. 27 लाख लोकांनी त्यांचे फेसबुक पेज लाईल केले आहे. तर राजे यांच्या ट्विटर अकाउंटचे 1,26,000 फॉलोअर्स आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा सीएम राजे यांचे वेग-वेगळे अंदाज...