आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dainik Bhaskar First Dvarakaprasad Agarwal Award

प्रभात रंजन यांना द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - "कोठागोई' या दीर्घकथांच्या पुस्तकामुळे चर्चेत आलेले तरुण साहित्यिक प्रभात रंजन यांना दैनिक भास्करचा पहिला द्वारकाप्रसाद अग्रवाल पुरस्कार दिला जाणार आहे. रंजन यांना रविवारी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रंजन यांना २००६ मध्ये प्रेमचंद सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. ते पेशाने प्राध्यापक असून दिल्लीच्या झाकीर हुसेन महाविद्यालयात शिकवतात. त्यांचे "जानकी पुल' व "बोलेरो क्लास' हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी खुशवंत सिंग यांच्या "खुशवंतनामा', मोहसीन हामिद यांची कादंबरी"मोथ' यासह १८ पुस्तकांचे भाषांतर केले आहे.