आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानगुटीवर बसून सुनेने सासूला बेदम मारले, डोक्यात घातली विट, बघा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनौर (राजस्थान)- सासू आणि सुनांची भांडणे नित्याचीच आहेत असे म्हटले जाते. घरोघरी मातीच्या चुली हा शब्दप्रयोग वापरुनही हे वास्तव मांडले जाते. पण राजस्थानमधील एका सुनेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सासू बेडवर बसली असताना ही सून चक्क तिच्या मानगुटीवर बसली. तिला बेदम मारले. त्यानंतर तिच्या डोक्यात विट घातली. सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न या सुनेने केला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत टिपण्यात आला आहे.
संगीता जैन असे सुनेचे तर 70 वर्षीय सासूचे नाव राजराणी जैन आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सासूला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संगीताला अटक करण्यात आली. हा व्हिडिओ 5 जानेवारीचा आहे. घटना घडली तेव्हा दोघीच घरी होत्या.
या व्हिडिओत दिसते, की एका खोलीतील बेडवर सासू बसली आहे. तिच्या भोवती पांघरुण आहे. तिच्या मागच्या बाजूने संगीता खोलीत प्रवेश करते. त्यानंतर लगेच ती एका कापडाने सासूचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान ती सासूच्या डोक्यावर जोरदार बुक्क्याही मारते. काही मिनिटे हा प्रकार चालतो. त्यानंतर संगीता एका विट आणते. सासूच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार करते.
सध्या सासूवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत बोलताना ती सांगते, की माझी सुन किचनमधून बाहेर आली. तिने अचानक माझ्यावर हल्ला चढवला. तिने विटेने माझ्या डोक्यावर प्रहार केला. तिने असे का केले याची मला कल्पना नाही.
राजराणी यांचा मुलगा संदीपने सात वर्षांपूर्वी संगिताशी लग्न केले होते.
घाबरलेल्या संदीपने सांगितले, की संगीताला मारायला आवडते. तिने माझ्यावरही असाच हल्ला केला होता. ती माझ्या आईवडीलांनाही मारते. त्यामुळेच मी घरी सीसीटीव्ही कॅमेरा लावला. मला याची पोलिस तक्रार करायची होती. आता माझ्या हातात सबळ पुरावा आहे. मी पहिल्यांदा याची तक्रार पोलिसांना केली होती. तेव्हा त्यांनी पुराव्याअभावी कोणतीही कारवाई केली नव्हती.
या घटनेचा तपास करणारे वरीष्ठ पोलिस अधिकारी दलजित चौधरी म्हणाले, की संगीताने अमानवीय कृत्य केले आहे. आमच्याकडे या घटनेचे फुटेज आहे. आम्ही निश्चितच कठोर कारवाई करु. आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, सून अशी बसली सासूच्या मानगुटीवर.... असे मार मार मारले.... डोक्यात घातली विट....
बातम्या आणखी आहेत...