आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Died In Chemical Tanker Blast On Delhi Jaipur Highway

जयपूर- दिल्ली महामार्गावर गॅस टँकरचा स्‍फोट, 10 जणांचा होरपळून मृत्‍यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर-दिल्ली महामार्गावरील बीलपूर गावापासून 35 किमी अंतरावर एका गॅस टँकरने पेट घेतल्याने झालेल्या भीषण स्फोटात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 12 जण भाजल्‍यामुळे जखमी झाले आहेत.
शनिवारी रात्री उशीरा ही दुर्घटना घडली. हा स्‍फोट इतका भयानक होता की, या मार्गावरून जाणा-या इतर वाहनांनी पेट घेतला. तीन किलोमिटर पर्यंतचा परिसर या स्‍फोटामुळे हादरून गेला. रात्री अचाकन झालेल्‍या या स्‍फोटामुळे गावातील अनेक लोक घराबाहेर पडले. स्‍फोटातील आगाची लोळामूळे एक तास घटनास्‍थळावर प्रशासनाचे लोक पोहचू शकले नाहीत. इतर वाहनांची आग दोन तासात आटोक्यात आणली. मात्र स्‍फोट झालेले टँकरमधून सकाळपर्यंत ज्‍वाळा बाहेर पडत होत्‍या. स्‍फोटात मृत्‍यू झालेल्‍यांपैकी तिघांची ओळख पटल्‍याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन दीप यांनी दिली.
पुढील स्‍लाईडवर पाहा टँकरच्‍या स्‍फोटाची फोटो...