राजस्थानमध्ये पर्यटनस्थळांची कमतरता नाही. या राज्यात अनेक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. वाळवटांचा प्रदेश असला तरी या राज्यात अरावली पर्वतांच्या रांगा पाहायला मिळतात. उदयपूर जिल्ह्यात अशाच एका पाहाडाला पोखरून 550 वर्षांपूर्वी तयार केलेल्या 'नीमरान' किल्ल्याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या किल्ल्यावर असलेल्या स्िवमिंग पुलाचा आनंद घेण्यासाठी जगभरातील पर्यटकांची वर्दळ येथे असते.
कसा तयार केला किल्ला-
10 मजली किल्ला तयार करण्यासाठी अरावली पर्वातावरील एका मोठ्या पाहाडाला पोखरून हा किल्ला तयार करण्यात आला. या किल्ल्यावर चढाई करताना
आपण एखादा पाहाड चढत आहोत अशा प्रकारचा फील आल्याशिवाय राहात नाही. किल्ल्यावर इंग्रजांच्या काळातील काही खाणा-खुणा आजही दृष्टीस पडतात. या किल्ल्यावरच्या प्रत्येक महालाला बालकनीची सोय करण्यात आले आहे.
प्रत्येक माहालाला आहे वेगळे नाव-
या किल्ल्यावर 50 महाल आहेत. या प्रत्येक महालाला वेगवेगळी नाव देण्यात आले आहेत. देव महालापसून गोपी महालापर्यंत कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
काय आहे या किल्ल्याचा इतिहास-
आज पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याला पृथ्वीराज चौहान यांच्या राज्याची राजधानी म्हणून ओळखले जात होते. 1192 मध्ये मुहम्मद गौरीसोबत झालेल्या लढाईत पृथ्वीराज चौहान यांचा मृत्यू झाला. यानंतर चौहान वंशाचे राजे राजदेव 'नीमराना' किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केली. मात्र मियो नावाचा बहादुर शासकने चौहानचा लढाईत पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा पासून या किल्ल्याला नीमराना नावाने ओळखले जाऊ लागले.
पुढील स्लाईडवर पाहा नीमराना किल्ल्याची छायाचित्रे...