आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Firing On Asaram Witness Amrit Prajapati In Rajkot

आसाराम बापूंविरुद्ध साक्ष देणाऱ्यावर बेछूट गोळीबार, प्रकृती धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट (राजस्थान)- अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू यांच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या अमृत प्रजापती यांच्यावर दोन अज्ञात युवकांनी बेछूट गोळीबार केला. प्रजापतींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात येत आहे.
राजकोट येथील पेडक रोडवरील ओमशांती क्लिनिकमध्ये प्रजापती गेले होते. यावेळी बाईकवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. याची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रजापतींना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना किती गोळ्या लागल्या हे अजून समजलेले नसून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
प्रजापती काही दिवसांपूर्वी आसाराम बापूंच्या आश्रमात वैद्य होते. तब्बल 12 वर्ष अहमदाबाद येथील आश्रमात वैद्य राहिलेल्या प्रजापतींनी नुकतीच नोकरी सोडली होती. या आश्रमातील एक सेविकेने आसाराम बापूंवर लैंगिक शोषणााचा आरोप केला होता. त्यानंतर प्रजापतींनी आश्रमात होत असलेल्या गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता.
प्रजापती यांनी काय साक्ष दिली होती वाचा पुढील स्लाईडवर.....