आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न रोखण्यासाठी पोहोचली पहिली पत्नी, मांडव सोडून पळाला पती, पण लग्न झाले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरोज सिंधी यांनी पोलिसात पतीच्या दुसऱ्या लग्नाची तक्रार दिली. - Divya Marathi
सरोज सिंधी यांनी पोलिसात पतीच्या दुसऱ्या लग्नाची तक्रार दिली.
जयपूर (राजस्थान)- पहिली पत्नी असतानाही घटस्फोट न घेता पती दुसरे लग्न करणार होता. पण ऐनवेळी पहिली पत्नी लग्न मांडवात येऊन पोहोचली. त्यानंतर पती मांडव सोडून पळून गेला. या लग्नाची पोलिस तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर वऱ्हाडीही मांडव सोडून पळाले. पण यापूर्वी पतीचे दुसरे लग्न झाले होते. पोलिसांनी कारवाई करण्यात उशीर केल्याने दुसऱ्या लग्नाचे सोपस्कर पार पडले होते.
जोधपूर निवासी सरोज सिंधी दिल्लीच्या एका खासगी संस्थेत काम करीत होती. यावेळी राजस्थानमधील बलबीरसिंह याच्यासोबत तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबर 2011 रोजी दोघांनी आर्य समाज मंदिरात रितसर लग्न केले. यावेळी दोघांचे मोजके मित्रमैत्रिणी उपस्थित होते. लग्नानंतर 10 दिवसांनी बलबीरसिंह याने कुटुंबीयांच्या दबावामुळे दिल्लीच्या एका मुलीशी साखरपुडा केला. सरोजला याची माहिती मिळाली. तिने लग्नाचे फोटो मुलीच्या घरी पाठवले. त्यानंतर हे लग्न मोडले. कालांतराने बलबीर नोकरी सोडून राजस्थानमधील पालकांच्या घरी राहायला गेला.
जयपुरमध्ये केली लग्नाची तयारी
त्यानंतर बलबीरने जयपुरच्या एका मुलीशी लग्न करण्याची तयारी केली. याची माहिती सरोजला मिळाली. त्यानंतर तिने याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. मात्र पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नाही. यात बलबीरचे लग्नही झाले. पोलिसांनी बलबीरला अटक केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, पोलिस ठाण्यात आले बलबीर आणि सरोज....
बातम्या आणखी आहेत...