आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमेर उर्सः जेवणासाठी लागते कोट्यवधी रुपयांची बोली, तीन वर्षांचे आहे वेटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर- राजस्थानच्या अजमेर शरीफमधील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला अलैह यांच्या मजारवर 803 व्या उर्साची सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही तुम्हाला वेळोवेळी विशेष माहिती देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला येथील जेवणाची माहिती देणार आहोत. येथील दोन अवाढव्य कढईत एकाच वेळी सहा हजार लोकांचे भोजन तयार करता येऊ शकते.
उर्साच्या वेळी होतो लिलाव, लागते कोट्यवधी रुपयांची बोली
वार्षिक उर्साच्या वेळी जेवणासाठी लिलाव केला जातो. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावली जाते. सध्या याची पुढील तीन वर्षांचे बुकींग करण्यात आले आहे. अनेक श्रीमंत लोक याच्या प्रतिक्षा यादित असतात. येथे असलेल्या कढईत दररोन नवनवीन पदार्थ तयार केले जातात. येथे येणाऱ्या भाविकांमध्ये हे पदार्थ वाटले जातात. या दरगाहच्या खादिमांची संस्था अंजुमनच्या देखरीत हे काम केले जाते. लिलावातून मिळालेल्या रकमेतून येथे वर्षभर लंगर चालवला जातो. तसेच मुलांना निःशुल्क शिक्षण दिले जाते.
शाकाहारी जेवणच तयार केले जाते
या कढईंमध्ये केवळ शाकाहारी जेवण तयार केले जाते. यासाठी तांदूळ आणि मैद्याव्यतिरिक्त जाफरान, तुप, गुळ, साखर, सुखा मेवा, हळद आदी पदार्थांचा वापर केला जातो. येथील मोठी कढई मुघल बादशहा अकबर याने तर छोटी कढई बादशहा जहांगीर यांनी दान केलेली आहे. मोठ्या कढईत 4,800 किलोग्रॅम तर लहान कढईत 2240 पदार्थ तयार केले जाऊ शकतात. उर्स व्यतिरिक्त इतर दिवसांमध्ये या कढईंमध्ये पदार्थ तयार करायचे असेल तर लहान कढईसाठी 60 से 75 हजार रुपये तर मोठ्या कढईसाठी एक लाख 40 हजार रुपये द्यावे लागते.
अशी घडली होती दुर्घटना
2013 मध्ये केरळच्या कुन्नूर येथील 58 वर्षीय सुल्फजा आणि त्यांची 23 वर्षांची मुलगी सरीन यांचा स्वयंपाक सुरु असताना या कढईत पडून मृत्यू झाला होता. या दोघींनी आत्महत्या केली होती की त्या त्यात पडल्या होत्या, याची नेमकी माहिती अजूनही समजू शकलेली नाही. मन्नत मिळवण्यासाठी दोघींनी यात उडी मारली होती, असेही सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अजमेर शरीफमधील या दोन कढई... यात शिजवले जाते अन्न...