(हॉटेल राज पॅलेसमध्ये झालेल्या रॉयल वेडिंगमध्ये स्पॅनिश वराती सहभागी झाले होते.)
जयपूर (राजस्थान)- भारतातील संस्कृती बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अशाच एका मॉक वेडिंगमध्ये तब्बल 300 स्पॅनिश वराती झाले. त्यांनी भारतीय पद्धतीनुसार दुपट्टा लावून नवरीला मंडपात आणले. जोरदार धम्माल केली. या वेडिंगची जयपूर आणि परिसरात मोठी चर्चा झाली.
शाही लवाजम्यासह वराती
राज पॅलेसमध्ये झालेल्या लग्नात शाही अंदाज दिसून आला. नवरींनी लाल रंगाचा शालू तर नवदेवांनी शेरवानी परिधान केली होती. त्यांची वरात चक्क हत्तीवरून काढण्यात आली. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर दुपट्टा लावून नवरीला लग्नमंडपात आणण्यात आले. त्यानंतर मंत्रोपचारात शाही लग्न सोहळा पार पडला.
याच हॉटेलचे जनरल मॅनेजर अंकूर रारा यांनी सांगितले, की गेल्या वर्षी 350 स्पॅनिश लोकांचा दल मॉक वेडिंगसाठी आला होता. यातील 10 ते 12 जोडप्यांनी भारतीय पद्धतीने लग्न केले होते.
पुढील स्लाईडवर बघा, मॉक रॉयल वेडिंगचे शानदार फोटो...