आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यूझिक फेस्टिव्हलमध्ये चढली झिंग, बँडच्या तालावर विदेशी तरुणींनी धरला ठेका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विदेशी मैडबॉय मिंक बँडची सिंगर सबा आझाद डावीकडे बेभान विदेशी तरुणी)
जयपुर(राज्‍यस्‍थान) – देश विदेशातील कलांकारांनी म्‍युझिक फेस्‍टीव्‍हलमध्‍ये केलेल्‍या सादरीकरणामुळे रसिकांचे भान हरपले. सप्‍त्‍सुरांतील गोडवा, तालवाद्यांचा झंकार यामुळे उपस्थित देश विदेशातील रसिक मंत्रमुग्‍ध झाले होते.
जयपूरमधील होटेल क्लार्क्स आमेरच्‍या ताब्लू आर्ट गॅलरीच्‍या स्‍थापनेनिमित्‍त आयोजित म्‍युझीक फेस्‍टीव्‍हलमध्‍ये देश विदेशातील कलाकारांना निमंत्रित करण्‍यात आले होते. तीन दिवस चालणा-या या फेस्‍टीव्‍हलमध्‍ये बुधवारी नाथूलाल सोळंकी यांच्या नगाड्याचा तालावर रात्र धुंद झाली होती. त्‍यानंतर इझरायलचे शाय बेंजूर यांचे सादरीकरण झाले. त्‍यांनी अजमेरचे कव्‍वाल जकी अली आणि जाकिर अली सोबत जुगबंदी केली. दुस-या दिवसाचा समारोप दिल्‍लीच्‍या स्केवेंजर्स बँडच्‍या सादरीकरणाने झाले.
पहिल्‍या दिवशी सल्वाडोरच्‍या लॅटिन जॅम ट्रायो बँडच्‍या कलाकारांनी आपल्‍या संगीताचे सादरीकरण केले. त्‍यानंतर मुंबईहून आलेली मॅडबॉय मिंक बँडची सिंगर सबा आझाद आणि नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह यांनी वेस्टर्न म्यूझिकचे सादरीकरण केले.
पुढील स्लाइडवर पाहा, म्‍युझिक फेस्टिव्हलमधील छायाचित्रे..