आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FRIENDSHIP STORY OF LION Christian The Lion, News In Marathi

VIDEO: सिंहाला 15 वर्षांनंतरही आठवली मैत्री, भेटताच केले KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सिंहाची मैत्री या व्हिडिओला 100 कोटीहून अधिक हिट्स मिळाल्‍या)
जयपूर - जयपूरमध्‍ये सध्‍या सुरु असलेल्‍या इंडिअया फॉर अॅनिमल्‍स-2014 आंतरराष्‍ट्रीय परिषद सुरु आहे. तीन दिवस चालणा-या या परिषदेमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाच्‍या ऐस बुर्क आणि लॉयन ख्रिश्चियनची गोष्‍ट ऐकून सर्वजण अगदी आश्‍चर्यचक‍ीत झाले‍.
अशी आहे गोष्‍ट
1969 ची गोष्‍ट आहे. वयाच्‍या 21 व्‍या वर्षी बुर्क जगाच्‍या पर्यटनासाठी निघाला होता. तेव्‍हा इंग्‍लंडमध्‍ये सिंहाचे छावे विक्रीसाठी होते. सिंह घरी कसा पाळला जातो. या उत्‍सुकतेपोटी त्‍यांनी एक सिंहाचा छावा 5000 डॉलरला विकत घेतला. त्‍याचे नाव ख्रिश्यिचन ठेवले. त्‍याला घेऊन तो दरोज फिरायचा. त्‍याचा व्‍यायाम करायचा.
नंतर बुर्कला पटले की, सिंहाला जास्‍त काळ आपल्‍याकडे ठेवने नुकसानदायी ठरु शकते. त्‍यामुळे त्‍याने रिहेबिलिटेट करण्‍याचे ठरवले. एका प्राणीशास्‍त्रज्ञाजवळून त्‍याने माहिती घेवून सिंहाला आफ्रिकेच्‍या अभयारण्‍यात सोडून दिले.
15 वर्षांनंतर जेव्‍हा बुर्क अभयारण्‍यात ख्रिश्चियनला पाहायला गेला. तेव्‍हा तो पूर्ण बदलला होता. त्‍याचा एक परिवार झाला होता. तब्‍बल 15 वर्षांनंतर सुध्‍दा सिंहाने बुर्कला ओळखले. आणि 15 वर्षांपूर्वी तो जसा वर्तन करत होता तसेच वर्तन त्‍याने बुर्कसोबत केले. बुर्कला किस केले.
हा व्हिडिओ 2009 मध्‍ये युटयुबवर अपलोड केला गेला त्‍यावेळी जगातील सर्वांधीक प्रसिध्‍द व्हिडिओ तो झाला होता.
प्राण्‍यांना लागणार 'जयपूर फुट'
संशोधनाअंती विकलांग प्राण्‍यांसाठी कृत्रिम पायाची निर्मिती करण्‍यात आली आहे. त्‍याद्वारे प्राण्‍यांना चारी पायावर चालता येणार आहे. सुरुवातील प्रायोगिक स्‍वरुपात गायी आणी कुत्र्यांवर याचा प्रयोग होणार आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, प्राणी आणि मणुष्‍याची निवडक छायाचित्रे.. VIDEO (अंतीम स्‍लाइडवर)