बिकानेर - पाकिस्तान नेहमी भारताविरोधात कुरापती करण्यात आघाडीवर राहिला आहे. भारताच्या नैसर्गिक सानधसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी यापूर्वी पाकिस्तानने अनेकदा प्रयत्न केला होता. परंतु, पाकिस्तानचा नापाक हेतू साध्य झाला नाही. तरीही आम्ही स्वयंपूर्ण आहोत अशी टीमकी पाक वाजवतो. मात्र, आजही पाकिस्तानाला भारताच्याच पाण्यावर अवलंबून राहावे लागते वस्तुस्थिती आहे.
देशामधील एका राज्याच्या वाट्याचे दहा वर्षांपासूनचे पाणी चोरण्याचे काम पाकिस्तान करत आहे. पंजाब राज्याकडून राजस्थानसाठी प्रत्येक वर्षी आठ अब्ज क्यूसेक पाणी सोडण्यात येते. याचे कॅनल पाकिस्तान सीमेला लागून आहेत. यातून यापेक्षा जास्त पाणी पाकिस्तान पळवत असल्याचे लक्षात आले आहे. या पाण्याची नोंद करण्यात आली आहे. या नोंदीनुसार, 2002-2003 या वर्षापासून (2013-2014) आजपर्यंत पाकिस्तानने 8.8 एमएएम पाणी पळवले आहे. या पाण्यामध्ये पाकिस्तान भारतीय सीमेला लागून असलेल्या जमिनीवर शेती करू शकतो.
भारताचे मात्र दुप्पट नुकसान
2006 पासून पाण्याच्या गळतीचे प्रमाण अचानक वाढले. 2006 ते 2012 या काळामध्ये 20 लाख क्यूसेकपेक्षा जास्त पाणी पाकिस्तानमध्ये गेल्याचे वास्तव समोर आले आहे. पाकिस्तान मात्र पाणीपट्टी भरण्यास तयार नाही. यामुळे भारताचे दुप्पट नुकसान होत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, काय आहे यामागील मुख्य कारण...