अजमेर- राजस्थानमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये रुचि श्रीवास्तव सर्वांत कमी वयाची नगरसेवक म्हणून निवडून आली आहे. ती वयाने केवळ 22 वर्षांची आहे. गुडगावमधील मल्टीनॅशनल कंपनीतील लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून ती राजकारणात शिरली आहे. मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंटमचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कॅम्पस इंटरव्हूच्या माध्यमातून तिला मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी लागली होती.
वसुंधरा यांनी आईला दिले नाही तिकीट तर स्वतः निवडणूक रिंगणार उतरली
भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका भारती श्रीवास्तव यांची रुचि मुलगी आहे. भाजपने भारती यांना तिकीट जाहीर केले नव्हते. त्यामुळे आईला अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरविण्याची तिची योजना होती. नोकरी सोडून ती आईचा प्रचार करण्यासाठी आली होती. पण वार्डातील लोकांनी तिलाच निवडणुकीत उभे राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने निवडणूक अर्ज दाखल केला होता. पण तिच्या जन्मतारखेचा घोळ असल्याचे निवडणूक अर्ज फेटाळण्यात आला होता.
त्यानंतर तिने वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी संपर्क साधून यावर तोडगा काढला. त्यानंतर तिचा अर्ज मान्य करण्यात आला. तिच्या विरुद्ध कॉंग्रेसच्या रितू गोयल, भाजपच्या सलोनी जैन आणि शिवसेनेच्या निशा चौहान मैदानात होत्या. पण लोकांनी तिच्या पारड्यात मताधिक्य टाकले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नगरसेविका रुचि श्रीवास्तवचे फोटो....