जोधपूर (राजस्थान)- मंगळवार दुपारची 2.30 ची वेळ. स्थळ- केएन कॉलेजपासून सुचना केंद्रावर जाण्यासाठी असलेला फुट ओव्हरब्रिज. यावेळी ब्रिजवर कुणीच नव्हते. एक विद्यार्थीनी सुचना केंद्राकडे जात होती. ती एकटी असल्याचे बघून एक रोडरोमियो तिच्या मागे लागला. आक्षेपार्ह टिप्पणी करु लागला... शिट्या मारु लागला... घाणेरडे इशारे करु लागला... पण विद्यार्थीनी सगळे सहन करीत होती. अखेर सहनशक्ती संपली. तिने गर्दी जमवली आणि सटाक-सटाक त्याच्या कानाखाली दिल्या.
ब्रिजवर असताना विद्यार्थीनीने सगळे सहन केले. पण तेथून खाली आल्यावर तिची सहनशक्ती संपली. यावेळी काही जण हे बघत होते. तिने कोणताही विचार न करता रोडरोमियोच्या कानाखाली जाळ काढला. यानंतर काही व्यक्ती तिच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या. त्यानंतर तिला आणखी बळ मिळाले. तिने त्याला चांगलेच झापले. उग्र जमाव बघून रोडरोमियोने माफी मागितली. उठबशा काढल्या. कधी असे करणार नाही, असे आश्वासन दिले.
पुढील स्लाईडवर बघा, एका रणरागिणीने कशी केली संकटावर मात...रोडरोमियोला कायमचा धडा शिकवला...कानाखाली सटाक सटाक दिल्या....