15 आक्टोंबर हा दिवस 'इंजीनियर डे' म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला एका इंजीनियरची माहिती देणार आहोत, ज्याने अंधाळ्या व्यक्तीसाठी शूज तयार केले आहेत. या बुटामुळे अंधाळ्या व्यक्तीला काठीचा अधार घ्यावा लागणार नाही.
राजस्थानच्या तंत्रशिक्षण विद्यापीठातील आयटी इंजीनियर अनिरूद्ध शर्मा याने विशिष्ट प्रकारचे बुट तयार केले आहेत. 'ले चल शूज' या कल्पनेतून शूज तयार करण्यात आले असल्याची माहिती अनिरूद्ध शर्मा याने दिली आहे.
कशी मिळाली प्रेरणा-
अनिरूद्ध शर्मा याच्या आजोबांची शुगरमुळे दृष्टी लोप पावत चालल्यामुळे, आजोबांसाठी
आपण काही करू शकतो का? या प्रेरणेतून आंधाळ्या लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न अनिरूद्ध शर्मा करत होता. या प्रयत्नातून 'ले चल शूज' कल्पना आकाराला आली.
मित्राच्या मदतीने उभारली कंपनी-
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिरूद्ध शर्माने आपल्या मित्रासोबत 'ड्यूसेर टेक्नॉलॉजीज' नावाच्या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून 'ले चल शूज' नावाची कल्पना साकार झाली. 'ले चल शूज'च्या पेंटटसाठी शर्माने अर्ज दाखल केला आहे.
काय आहे शूजची वैशिष्ट्ये-
'ले चल शूज' तयार करण्यासाठी व्हायब्रेटर, सेंसर आणि ब्लूटूथ पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. ब्लूटूथचा वापर करून तुमच्या स्मार्टफोन सोबत जोडता येतो. यामुळे पुढे काय आहे, याचा अंदाज आधंळ्या व्यक्तीला घेता येतो. यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्यामुळे आधंळ्या व्यक्तिला वापरण्यासाठी हे शूज लाभदायक ठरणार आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा 'ले चल शूज'चे फोटो...