आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्ण वातावरणातही उड्डाण करण्यात यशस्वी झाले स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान)- स्वदेशी हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरने (लाइट कॉम्बेट हेलिकॉप्टर किंवा एलसीएच) उष्ण वातावरणातही उड्डाण करण्याची चाचणी यशस्वीपणे पास केली आहे. सुमारे एक आठवडा चालेल्या या चाचणीत 39 ते 42 डिग्री सेल्सियस तापमानात हेलिकॉप्टरने उड्डाण केले. अतिशय थंड वातावरणात उड्डाण करण्याची चाचणी या हेलिकॉप्टरने आधीच पास केली आहे.
जोधपूरमध्ये झाली चाचणी
तांत्रिक चाचणी घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर बंगळुरु येथून जोधपुरला आणण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या तापमानात इंजिन, हायड्रोलिक प्रणाली, वेगवेगळे दबाव, वजन आणि गती आदींची चाचणी करण्यात आली. हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या हिंदूस्तान एरोनोटिक्स लिमिटेडचे (एचएएल) प्रमुख टी. सुवर्ण राजू यांनी सांगितले, की चाचणीच्या वेळी वायुदल आणि लष्कराचे वैमानिक आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते.
लेहमध्येही झाली चाचणी
अत्यंत गार वातावरणात या हेलिकॉप्टरची चाचणी करण्यासाठी लेहची निवड करण्यात आली होती. यावेळी इंजिनपासून बॅटरीपर्यंतच्या सर्वच भागांची चाचणी करण्यात आली. चार किलोमीटर उंचीवर या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा एचएएलने सांगितले होते, की -18 डिग्री तापमान आणि चार किलोमीटर उंचीवरही इंजिन योग्यपणे काम करीत होते. या वर्षाच्या अखेरीस या हेलिकॉप्टरला इनिशिअर ऑपरेशन क्लिअरन्स मिळेल. याच्या चाचणीला 2010 मध्ये सुरवात झाली होती.
असे आहे हे हेलिकॉप्टर
साडे पाच टन वजन
दोन पॉवरफुल इंजिन
अॅडव्हान्स लाइट फॅसिलिटी
दिवसा आणि रात्री कमी उजेडातही लक्ष्य भेदू शकते
रडार, लेजर मिसाईल वॉर्निंग सिस्टिम
पुढील स्लाईडवर बघा, या हेलिकॉप्टरचे उड्डाण करतानाचे फोटो.... अशी आहे मिसाईल व्यवस्था....