आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राजस्थानच्या झालावाडमध्ये महापुराने हाहाःकार, चार जण वाहून गेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर/कोटा- राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून नद्यांची रुंदी कैकपटीने वाढली आहे. ठिकठिकाणी पाणी साचून आहे. रस्ते आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली आल्याने वाहतूक व्यवस्था विस्तळित झाली आहे. सखल भागात राहत असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोटात पाणी साचल्याने गावाचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजेस यांच्या इमारतींमध्ये पाणी शिरले आहे.
अजमेरमध्ये पाण्याच्या प्रवाहातून जात असताना एक व्यक्ती वाहून गेली. जरा वेळाने तिला वाचविण्यात आले. उदयपुरच्या खाल नदी पार करण्याचा प्रयत्न करीत असलेले दोन वृद्ध वाहून गेले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एकाने झाडाची फांदी धरुन ठेवल्याने जीव वाचला.
झालावाड आणि मनोहरना परिसरात १० इंच पाऊस झाला. अकलेरा येथील कालीसिंध आणि आहू नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अजमेर जिल्ह्यातील कादेडा परिसरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही घरांचे नुकसान झाले आहे. किशनगडमध्ये वीस मिनिटे झालेल्या पावसाने रस्ते जलमग्न झाली आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, राजस्थानमध्ये आलेल्या महापुराची दृष्ये....