आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुसळधार पावसाने राजस्थानातील अनेक गाव जलमग्न, रस्त्यांच्या झाल्या नद्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- श्रावणी सोमवार म्हणजेच काल राजस्थानातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने जनजिवन पुन्हा विस्कळित झाले. बऱ्याच ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक गाव रिकामे करण्यात आले. पावसामुळे रस्त्यांच्या नद्या झाल्या आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे. रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.
जयपूरमधील अनेक शासकीय इमारतींमध्ये पाणी शिरले आहे. या कार्यालयांमधील कागदपत्रे भिजली आहेत. नद्या दुथडी भरुन वाहत असून त्यांचे पाणी पूलांवरुन वाहत आहे. त्यामुळे वाहतूक थांबली आहे. रस्त्यांवर पाणी साचून राहिल्याने त्यातून प्रवास करावा लागत आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. या शहरात आतापर्यंत 287.25 एमएम पाऊस पडला आहे.
14 वर्षांनी रामसागर तलाव भरला
हिंडौली उपखंड क्षेत्रात गेल्या 12 तासांत मुसळधार पाऊस झाल्याने गेल्या 14 वर्षांत पहिल्यांदाच रामसागर तलाव भरला आहे. परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. यापूर्वी 2001 मध्ये हा तलाव भरला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच तलावातील पाणी ओसंडून वाहत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, जयपूर आणि आजूबाजूचे गाव असे जलमग्न झाले आहेत...