कोटा- राजस्थानमधील स्वातंत्र्यता दिवसाच्या मुख्य समारंभात कसरती दाखवत असताना पोलिसाचा जवान घोड्यावरुन जोरदार आपटला. त्याला वाचविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी मैदानावर धावत आले. त्याची मदत केली. त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी रुग्णालयात जाऊन जवानाची भेट घेतली. यावेळी रुग्णालयात अतिशय गंभीर वातावरण होते. आता मुख्यमंत्री काय म्हणतील, असे सर्वांना वाटत होते. त्यावर पडदा टाकत मस्करी करीत वसुंधरा जवानाला म्हणाल्या, की तुम्ही आमची कुंडी फोडली. त्यानंतर जवानासह उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
69 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराज उम्मेदसिंह स्टेडियमवर राज्यस्तरीय समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस विभागाच्या जवानांनी घोड्यांवर, मोटरसायकलवर वेगवेगळ्या कसरती सादर केल्या. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दुचाकीवर देखावाही सादर करण्यात आला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मुख्य कार्यक्रमात कसा झाला अपघात... घोडेस्वार कसा कोसळला खाली...