आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Attack Wife By Sword At Her Lover\'s Home

भाडेकरुसोबत पळाली महिला, 3 महिन्यांनी दिसली तर पतीने तलवारीने केले वार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर/जयपूर (राजस्थान)- विवाहित महिलेचे भाडेकरु तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघे घर सोडून पळून गेले. त्यानंतर या महिलेच्या पतीने तिला शोधण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती सापडली नाही. एका लग्नाच्या निमित्ताने तो उमरडा गावात आला होता. यावेळी त्याला पत्नी दिसली. त्याने नातलगांसह तिचे घर गाठले. येथे ती प्रियकर तरुणासोबत राहत होती. तिला समजवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती घरी येण्यास तयार नव्हती. यावेळी पतीने तिच्यावर तलवारीने वार केले. ती गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या विवाहितेचे नाव विमला (वय 27) असे आहे. तिचे दिनेश यांच्यासोबत लग्न झाले असून या दांपत्याला दोन मुलेही आहेत. दिनेश आणि दोन मुलांना सोडून विमला भाडेकरु तरुणासोबत पळून गेली होती. त्यानंतर तो तरुण आणि विमला उमरडा गावात राहत होते. दिनेशने आणि सासरच्या लोकांनी तिला खुप शोधले. पण काही पत्ता लागला नाही.
दिनेश काल उमरडा गावात एका लग्नासाठी आला होता. तो वरातीत सहभागी झाला होता. वरात बघण्यासाठी एक घरातून विमला बाहेर आली. दिनेशने तिला ओळखले. त्यानंतर तिला समजवण्यासाठी नातलगांसोबत तिच्या घरी गेला.
यावेळी प्रियकर तरुण बाजारात गेला होता. दिनेश आणि नातलगांनी विमलाला घरी येण्यासाठी खुप समजावले. पण ती काही तयार नव्हती. अखेर चिडलेल्या दिनेशने तिच्यावर तलवारीने वार केले. त्यानंतर दिनेश आणि सोबत आलेले नातलग पळून गेले. तरुण घरी आल्यावर त्याला घडलेला प्रकार समजला. त्याने तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनेश आणि त्याच्या नातलगांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, जखमी झालेली विमला...