जोधपूर- राजस्थानमध्ये पाकिस्तान बॉर्डरजवळ भारतीय लष्कराकडून सर्वांत मोठी मिलिटरी एक्सरसाईज राबवली जात आहे. जैसलमेर आणि बाडमेरच्या 400 स्केअर किलोमीटर परिसरात होत असलेल्या या एक्सरसाईजमध्ये तब्बल 50 हजार जवान सहभागी झाले आहेत. यात अनेक वरिष्ठ अधिकारीही आहेत. याला 'बाज गती' असे नाव देण्यात आले आहे.
का महत्त्वाची आहे एक्सरसाईज
- यापूर्वी कोणत्याही मिलिटरी एक्सरसाईजमध्ये 30 हजार जवानांपेक्षा जास्त जवानांनी भाग घेतला नव्हता.
- पाकिस्तान आणि चीनने 2011 पासून चार वेळा मोठ्या संयुक्त मिलिटरी एक्सरसाईज केल्या आहेत. या सगळ्या एक्सरसाईज भारतीय सिमेजवळ करण्यात आल्या.
- पाक-चीन या दोन देशांमध्ये पाकिस्तानच्या पंजाब राज्यात झालेल्या पीस अॅंजल एक्सरसाइजमध्ये सुमारे 40 हजार जवानांनी भाग घेतला होता.
- त्यानंतर भारताने पाकिस्तान सिमेवर ही एक्सरसाईज प्लॅन केली आहे.
- याची माहिती पाकिस्तानला आधीच देण्यात आली होती. तरीही प्रोटोकॉल तोडून पाकिस्तानने अतिरिक्त माहिती मागितली होती.
यात काय आहे खास
- पहिल्यांदाच 50 हजारांपेक्षा जास्त जवान जैसलमेर आणि बाडमेरमध्ये जमा झाले आहेत.
- यात जमिनीवरुन जमिनीवर मारा केल्या जाणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलचाही वापर करण्यात येत आहे.
- या शिवाय इतरही अत्याधुनिक शस्त्रांचा, साधनांचा वापर यात केला जात आहे.
- यात भोपाळ येथील 21 स्ट्राइक कोर आणि जोधपूर येथील 12 कोरमधील जवान सहभागी झाले आहेत.
- 16 सप्टेंबर रोजी अतिशय गोपनियपणे एक्सरसाइज सुरु करण्यात आली. डिसेंबरपर्यंत ही चालणार आहे.
- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लष्कराचे मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग उपस्थित राहतील.
पुढील स्लाईडवर बघा, भारतीय लष्कराकडून केल्या जाणाऱ्या सर्वांत मोठ्या एक्सरसाईजचे चित्तथरारक फोटो....