आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Mujahidden Terrorist Hearing In Jaipur Court

गुजरात दंगलीचा बदला घेण्‍यासाठी बॉम्बमध्‍ये भरले विष, दहशवाद्याचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात दंगल आणि गोपालगडमध्‍ये झालेल्‍या हिंसेचा बदला घेण्‍यासाठी बॉम्‍बमध्‍ये विष भरले होते, अशा प्रकारचा खुलासा इंडियन मुजाहिदीन (आयएम) संघटनेचा दहशतवादी जियाउर्रहमान यांने केला.
स्‍पोटकामध्‍ये केस्‍टर सीड्स या नावाचे रसायन बॉम्‍बमध्‍ये भरले होते. या रसायनामुळे स्‍पोटानंतर शरिरात वीष गेल्‍यामुळे जास्‍त लोक मारले जातील या उद्देशाने आयएम संघटनेने बॉम्‍बमध्‍ये वीष भरले होते. याचा खुलासा एटीएस अधिका-यांनी साजर केलेल्‍या 3447 पानाच्‍या अहवालात केला आहे. या यामध्‍ये 180 लोकांचा जबाब नोंदवण्‍यात आला आहे. बॉम्‍बमध्‍ये वीष भरले होते असा खुलासा करणारा दहशतवादी जियाउर्रहमान उर्फ वकास न्‍यायिकला न्‍यायालयीन कोठडीमध्‍ये आहे.
या‍सीन भटकल आणि असदुल्ला अख्‍तर यांना ताब्यात घेतल्‍यामुळे आयएमचा कमांडर तहसीन दिल्लीवर बॉम्‍ब हल्ला करणार होता. यासाठी ही स्‍पोटके आणि बॉम्‍ब तयार करण्‍यात आली. यासाठी राजस्‍थानमधील आयएमचा सदस्‍य असलेले मारूफ, वकार आणि साकिब यांना बॉम्‍ब तयार करण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यात आले. स्‍फोट झाल्‍यानंरत जास्‍तीतजास्‍त लोक मारले जातील या उद्देशाने बॉम्‍बमध्‍ये विष भरण्‍यात आले होते.
चार्टसीट दाखल-
मोहम्मद सज्जाद, मोहम्मद आकिब, मोहम्मद उमर, मोहम्मद वाहिद, मोहम्मद वकार, अब्दुल मजीद, मारुफ, वकार अजहर, अम्यार यासर, साकिब अंसारी, बरकत अली, अशरफ अली, मशफल इकबाल या आरोपींवर चार्टसीट दाखल करण्‍यात आली आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा दहशतवाद्यांना कोर्टात घेऊन जातानाची फोटो...