आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम करतांना मस्जिद खाली सापडले तळघर आणि गुप्त रस्ता, पुरातत्व विभाग करणार संशोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - रतलाम येथे एका मस्जिदच्या विस्ताराचे कामकाज सुरु होते. मस्जिदच्या आजूबाजूला सुरु असलेल्या खोदकामादरम्यान अठराव्या शतकातील तळघर आणि गुप्त रस्ता सापडला. याबद्दल शहरभर चर्चा सुरु आहे. उपजिल्हाधिकारी कैलाश बुंदेला यांनी याठिकाणी भेट देऊन सांगितले की, तळघर नेमके काय आहे, कशासाठी निर्माण करण्यात आले याचा थांगपत्ता तपासणीअंती लागेल. 
 
... असे समोर आले तळघर आणि गुप्त रस्ता
 
रावलागढी पिरसरातील जुन्या कचेरी नजीक असलेल्या मस्जिदचे विस्ताराचे काम सुरु होत. साधारणत: 18 फूट खोल खोदकाम झाल्यानंतर कामगारांना याठिकाणी जुन्या बांधकाम केलेल्या विटा आढळून आल्या. हे पाहताक्षणी त्यांनी याची माहिती कंत्राटदार आणि कमिटीच्या लोकांना दिली. 
 
- त्यानंतर ही माहिती पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आली. प्रशासनाच्या देखरेखीखाली खोदकाम केल्यानंतर आत चुन्यामध्ये तयार केलेले तळघर दिसले. तळघराच्या दोन्ही कोपऱ्यात गुप्त रस्ताही सापडला. मात्र, या हे गुप्तइ रस्ते मातीने भरल्याने जास्त पुढे जाता आले नाही. याची चर्चा गावभर वाऱ्यासारखी पोहोचली. जो तो हे तळघर पाहण्यासाठी गर्दी करू लागला. गर्दीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने ताबडतोब खोदकाम थांबवले. त्यानंतर पुरातत्व विभागाला पाहणी करण्याच्या सूचना केल्या. 
 
- प्रशासनाच्या आग्रहाखातर पुरातत्व विभागची टीम तपासणीसाठी पोहोचली. विभागातील अधिकारी डॉ. पांडेय यांनी निरीक्षण करून सांगितले की, या प्रकारचे बांधकाम मराठा साम्राज्यात होत होते. त्यावरुन तळघर आणि गुप्त रस्त्याची निर्मीती मराठ्यांच्या काळात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
- त्यांनी सांगितले की, तळघराचा वरचा भाग पूर्णत: नष्ट झालेला आहे. त्यामुळे या तळघर निर्मीतीचा उद्देश स्पष्ट होणे अवघड आहे. यासाठी यासंदर्भात संशोधन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्थानिक इतिहासतज्ज्ञांनीचीही मदत घेतली जाईल. 
 
पुढे पाहा - तळघर व गुप्त रस्त्याचे काही फोटो
बातम्या आणखी आहेत...