आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • King Prithviraj Chavan Father Constructed This Island In Lake

कोरड्या रखरखीत पर्वतांमध्ये आहे हा गारेगार तलाव, त्यातील बेट म्हणजे सौंदर्याची पर्वणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (राजस्थान)- अनासागर तलाव आणि त्यातील बेट पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. कोरड्या रखरखीत पर्वतांमध्ये सुमारे 13 किलोमीटर परिसरात हा तलाव असून त्यात हे सुंदर बेट आहे. सायंकाळी या तलावाच्या शेजारी उभे राहिल्यास नाग पर्वताची नेत्रदिपक प्रतिकृती पाण्यात झळकते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वडीलांनी बांधले होते बेट
राजा 'अरणो रा आनाजी' यांनी 1135 ते 1150 दरम्यान हे बेट बांधले. यात सुंदर हिरवेगार बगीचे आहेत. त्यात संगमवर दगडांमध्ये आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. अरणो रा आनाजी हे पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील होते. या तलावाशेजारी मुघलांनी एक गार्डन तयार केले. त्याला दौलतबाग असे नाव देण्यात आले. त्याला सुभाष उद्यान असेही म्हटले जाते.
शहाजहांने केले संगमवरचे बांधकाम
1627 मध्ये बादशहा शहाजहांने या बेटाचे सुशोभिकरण केले होते. याच्या किनाऱ्यावर संगमवरचे पाच खांब आहेत. शहाजहांनेच याची निर्मिती केली होती. त्याला हा तलाव आणि बेट खुप आवडायचे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या अत्यंत सुंदर तलाव आणि संगमवरमध्ये केलेल्या बांधकामाचे फोटो....