आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी गजेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार, भाऊ बेशुद्ध, कुटुंबावर शोककळा, अनभिज्ञ चिमुकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- दिल्लीत आम आदमी पक्षाची सभा सुरु असताना गळफास घेऊन आत्महत्या केलेले गजेंद्रसिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गजेंद्र यांच्या आत्महत्येची बातमी समजली तेव्हापासून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव गावात आले तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले होते. कुटुंबीयांनी तर हंबरडा फोडला. घराच्या ओसरीत भावाचा मृतदेह बघून लहान भाऊ बेशुद्ध पडला. बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू जराही थांबत नव्हते. गजेंद्र यांच्या मुलांना नेमके काय झाले आहे, याची कल्पनाच नव्हती. अंत्यसंस्कार झाल्यावरही लहान मुलगा गावात चक्क खेळताना दिसून येत होता.
गजेंद्रची डायरी कुटुंबीयांनी क्राईम ब्रांचकडून हिसकावली
क्राईम ब्रांचची टीम गजेंद्र यांच्या घरी पोहोचली. त्यानंतर क्राईम ब्रांचचे अधिकारी घराची तपासणी करीत होते. यावेळी त्यांना गजेंद्र यांची जुनी डायरी सापडली. एका अधिकारी ही डायरी घेऊन घराबाहेर जात होता. तेव्हा कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीने या अधिकाऱ्याला रोखले. डायरी हिसकावली. गजेंद्र यांनी ही जुनी डायरी आहे. यात ते कविता लिहायचे. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांनी या ज्येष्ठांना समजावले. डायरीतील हॅंडरायटिंग आणि सुसाईट नोटमधील हॅंटरायटिंग तपासायची आहे, असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठाने ही डायरी नेण्याची परवानगी दिली.
केजरींनी एक मिनिटही भाषणा का रोखले नाही
गजेंद्रसिंह यांच्या बहिणीने रडत सांगितले, की आम्ही सगळे टीव्हीवर बघितले. केजरीवाल कसे भाषण देत होते. आमच्या भावाने फाशी घेतली होती. अशा वेळी केजरीवाल किमान एक मिनिट तरी राजकारण सोडू शकत नव्हते का... भाषण एका मिनिटासाठी रोखू शकत नव्हते... त्यांना लोकांची जराही काळजी नाही.
लहान मुलगा आपल्या धुंदीत
या घरावर शोककळा पसरली आहे. गावातील लोकही आपले अश्रू रोखू शकत नाहीत. आत्महत्येचे वृत्त समजले तेव्हापासून गजेंद्र यांचे आई आणि वडील वारंवार बेशुद्ध होत आहेत. मध्येच ते जागे होतात आणि पुन्हा बेशुद्ध पडतात. दुसरीकडे गजेंद्र यांचा छोटा मुलगा अगदी या घटनेपासून अनभिज्ञ होता. तो मित्रांसोबत खेळण्यात व्यस्त दिसत होता.
पुढील स्लाईडवर बघा, गजेंद्र यांच्या पार्थिवावर असे झाले अंत्यसंस्कार... गावावर पसरली शोककळा...