Home | National | Rajasthan | Meet This Tigress, Who Killed Big Crocodile In Few Minutes

ही आहे जगातील पहिली वाघीण, जी रणथंभोरमधील मगरींवरही तुटून पडली होती

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Apr 04, 2016, 03:00 PM IST

पाण्‍यातील मगरीसमोर हत्‍तीसारखे भलेमोठे प्राणीही गुडघे टेकवतात. मात्र, राजस्‍थानमधील सवाई मोधापूर जिल्‍ह्यात असलेल्‍या रणथंभोर व्‍याघ्रप्रकल्‍पात ही मछली नावाची (टी-16) प्रसिद्ध वाघीण मगरीसोबतही भिडते.

 • Meet This Tigress, Who Killed Big Crocodile In Few Minutes
  सवाई माधोपूर - पाण्‍यातील मगरीसमोर हत्‍तीसारखे भलेमोठे प्राणीही गुडघे टेकवतात. मात्र, राजस्‍थानमधील सवाई मोधापूर जिल्‍ह्यात असलेल्‍या रणथंभोर व्‍याघ्रप्रकल्‍पात ही मछली नावाची (टी-16) प्रसिद्ध वाघीण मगरीसोबतही भिडते. एकवेळ या वाघिणीने एका भल्‍या मोठ्या मगराची शिकार केली होती. एमडी पाराशर यांचे हे छायाचित्र देश विदेशात खूप नावाजले आहे.
  रणथंभोर येथील नरभक्षक वाघ उस्तादच्‍या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्‍या निर्णयानंतर हा प्रकल्‍प पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे. त्‍यानिमित्‍त आम्‍ही आपल्‍याला या उद्यानातील काही खास बाबी सांगत आहोत. या संग्रहात काही एक्सक्लूसिव्‍ह फोटो वापरले आहेत.
  - 2004 मध्‍ये रणथंभोर व्‍याघ्रप्रकल्‍पात भयंकर दुष्‍काळ पडला होता.
  - येथील प्राण्‍यांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची मोठी समस्‍या निर्माण झाली होती.
  - वनविभागाच्‍या वतीने परिसरात पाण्‍याची सोय करण्‍यात आली होती.
  - पाणवठे सुकल्‍यामुळे शेकडो मगरी बाहेर येऊन दाट झाडांमध्‍ये लपत असत.
  - यामुळे कित्‍येक मगरी ठार झाल्‍या.
  पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, वाघिणीची मगरीसोबत कशी झाली लढाई..

 • Meet This Tigress, Who Killed Big Crocodile In Few Minutes
  - एकदा या वाघिणीने एका लहानशा प्राण्‍याची शिकार केली.
  - वाघिणीने शिकार पदम तलावाजवळ ठेवली व ती तेथून निघून गेली.
  - तलावाजवळील झाडांमध्‍ये लपवलेल्‍या शिकारीवर तिने दोन छाव्‍यांना राखण ठेवले.
  - दरम्‍यान या शिकारीपर्यंत एक भलीमोठी मगर पोहोचली.

  पुढे वाचा, मगरीला पाहून वाघिणीने काय केले.. 
 • Meet This Tigress, Who Killed Big Crocodile In Few Minutes
  - मगरीला पाहून छाव्‍यांनी शिकार सोडली व ते 50 फूट लांब जावून बसले.
  - मगर शिकारीला फरफटत घाण पाण्‍यात घेऊन जात होती.
  - दरम्‍यान तेथे वाघिण पोहोचली. छावे दूर उभे असल्‍याचे पाहून प्रकरण तिच्‍या लक्षात आले.
   
  पुढे वाचा, वाघीण मछली आणि मगरीतील लढाईनंतर काय झाले.
 • Meet This Tigress, Who Killed Big Crocodile In Few Minutes
  - वाघीण झाडीतून थेट मगरीसमोर उभी झाली.
  - मगर भले मोठे तोंड उघडून वाघिणीला हुसकावण्‍याच्‍या प्रयत्‍नात होती.
  - वाघिणीला ही शिकार सोडायची नव्‍हती.
  - अचानक मगर वाघिणीपुढे सरकली.
  - वाघिणही सतर्क होती. तिने थेट मगरीच्‍या पाठीवर झेप घेतली.
  - दोघींमध्‍ये सुमारे 7 मिनीट ही लढाई रंगली.
  - अखेर वाघिणीने मगरीला ठार केले.

Trending