आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss Marwad And Camel Competition Held In Bikaner Rajasthan

Miss मारवाड होण्यासाठी पारंपरिक लुकमध्ये दिसल्या राजस्थानी युवती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकानेर (राजस्थान)- डाव्या हातात तलवार आणि उजव्या हातांनी मिश्यांना ताव देत सजलेल्या उंटांवर निघालेले स्वार, फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या राजस्थानी सौंदर्यवती, चौकांमध्ये परंपरिक राजस्थानी नृत्य सादर करताना तरुणी, उंटांच्या चित्तथरारक कसरती करताना उस्ताद असा काहीसा नजारा होता 23 व्या आंतरराष्ट्रीय कॅमल फेस्टिव्हलचा.
कुणी जिंकला मिस्टर आणि मिस मारवाडचा किताब
- हेमा कंवर राठोड आणि निशा सांखला यांनी मिस मारवाडचा किताब पटकावला.
- सुमन चौधरी दुसऱ्या क्रमांकावर तर शिखा राजपुरोहित तिसऱ्या स्थानावर राहिली.
- विदेशी आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या पर्यटकांनी सौंदर्यस्पर्धेला झळाळी आणली.
उंटांनी केला डान्स
या मेळाव्यात उंटांचा डान्स, त्यांची सजावट, धावण्याची स्पर्धा, चित्तथरारक कसरती झाल्यानंतर महिलांची सौंदर्यस्पर्धा घेण्यात आली. दिवस मावळल्यानंतर फेस्टिव्हलला आणखी रंगत चढली. यावेळी आकर्षक आतषबाजीही करण्यात आली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मेळाव्यातील सौंदर्य स्पर्धेचे फोटो.... उंटांनी अशा केल्या चित्तथरारक कसरती....