आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Memories About Jaipur Literature Festival 2015

जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या रंगबिरंगी, स्मरणात राहणाऱ्या आठवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर लिटरेचर फेस्टिवल ही तुम्ही किती चांगलं ऐकू शकता आणि किती चांगलं पाहू शकता, याची एक प्रकारे परीक्षाच असते. पाच दिवस. फ्रंट लॉन्स, चार बाग, बैठक, संवाद, मुघल टेंट आणि दरबार हॉल असे सहा मांडव. सकाळी दहा ते सहा या वेळात प्रत्येक मांडवात होणारी एक तासाची सहा ते सात सत्रं. एवढा या फेस्टिवलचा पसारा. प्रत्येक सत्र अचूक वेळी सुरू होणार आणि अचूक वेळी संपणार. सगळीकडे स्वच्छता. तरुण कार्यकर्त्यांची उत्साही फौज मदतीला तत्पर. सोबत खरेदीलाही भरपूर वाव - पुस्तकांच्या आणि कपड्यांच्या व दागिन्यांच्या. आणि खवय्यांची तर चंगळ. खिसा जरा गरम असायला हवा, एवढीच अट. पण खरेदीत रस नसेल तर एक नया पैसाही द्यावा लागत नाही, या बड्या साहित्यिकांना पाहायला/ऐकायला, हे जेएलएफचं वैशिष्ट्य. यंदा या फेस्टिवलला जवळपास अडीचशे लेखक/कलावंतांनी हजेरी लावली. तर तब्बल २.४५ लाख रसिकांनी साहित्य/कला/संगीत यांचा आस्वाद घेतला.
या फेस्टिवलचा रंगबिरंगी आस्वाद घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...