आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकबरांचे वंशज प्रिन्स याकूब ख्व्वाजाच्या दारी, बघ्यांची जमली मोठी गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर (राजस्थान)- बादशहा अकबर यांचे वंशज प्रिन्स याकूब हबीहउद्दीन हे जियारतसाठी ख्व्वाजाच्या दारी गेले. मला मुलगा झाला तर पायी चालत येत मी जियारत पेश करेन, अशी अकबर बादशहाने दरगाह शरीफमध्ये दुआ मागितली होती. अकबरांना सलिम नावाचा मुलगा झाल्यावर आग्रा येथून सुमारे 437 किलोमीटरचे अंतर उघड्या पायांनी कापत अजमेर यात्रा केली होती. ही परंपरा कायम राखत अकबरांचे वंशज पिन्स याकूब यांनी जियारत केल्यावर जन्नती दारावर मन्नती धागा बांधला. शाहजहांनी मशिदीत गेल्यावर त्यांना बघण्यासाठी लोकांनी खुप गर्दी केली होती.
प्रिन्स याकूब मुघल बादशहांच्या पोशाखात अजमेर शरिफला आले होते. यावेळी सय्यद गनी गुर्देजी यांनी प्रिन्स याकूब यांना बादशहा अकबर आग्रा येथून अजमेरला पायी आल्याचे चित्र भेट केले. त्यानंतर याकूब यांनी अजमेर शरिफ दर्ग्याच्या दारावर माथा टेकला. यासाठी प्रथम आपला टोप काढला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अकबरांचे वंशज प्रिन्स याकूब यांच्या अजमेर भेटीचे फोटो....