आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांसाठी चांद बावडी लवकरच सुरू होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - पायऱ्यांच्या भूलभुलय्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आभानेरी येथील चांद बावडी नवीन पर्यटकांसाठी लवकरच खुली केली जाणार आहे. केंद्र सरकारने या पर्यटनस्थळाच्या प्रचार-प्रसारासाठी निधीची तरतूद केली आहे. सुरुवातीला ५० लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. आजूबाजूचे अतिक्रमण हटवल्यानंतर तेथे जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे.
भूलभुलय्यासाठी ओळख

- विहिरीस २५० पायऱ्या आहेत. त्यात उतरून प्रत्येक पायरीवर नाणे ठेवून आले तरी चूक होतेच. चित्रीकरणासाठी आलेला अभिनेता गोविंदानेही ही बाब मान्य केली.
- विहिरीसंबंधी एक दंतकथा आहे. एकेकाळी विहिरीत असलेल्या काळोख-उजेडातील गुंफेत वरात उतरली होती. वरात गुंफेत गेल्यानंतर परतलीच नाही.