Home | National | Rajasthan | news about Live Report for Rajasthan srinagar

लोकांनी केवळ घोषणेतच नव्हे तर गर्भातही वाचवल्या मुली, श्रीगंगानगरची ही सुखद स्थिती

दिव्य मराठी वेब टिम | Update - Apr 06, 2017, 03:04 AM IST

श्रीगंगानगर पीसीटीएसच्या (प्रेग्नन्सी, चाइल्ड ट्रॅकिंग अँड हेल्थ सर्व्हिस मॅनेजमेंट) एक एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळातील पाहणीत मुलींसंबंधी सुखद परिणाम मिळाले. १५७ गावांमध्ये जिथे मुली १००० हून अधिक आहेत त्याच ६ गावांत ही संख्या २ हजारांवर गेली आहे.

 • news about Live Report for Rajasthan srinagar
  १००० मुलांवर २०५९ मुली
  श्रीगंगानगर पीसीटीएसच्या (प्रेग्नन्सी, चाइल्ड ट्रॅकिंग अँड हेल्थ सर्व्हिस मॅनेजमेंट) एक एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळातील पाहणीत मुलींसंबंधी सुखद परिणाम मिळाले. १५७ गावांमध्ये जिथे मुली १००० हून अधिक आहेत त्याच ६ गावांत ही संख्या २ हजारांवर गेली आहे.
  ४ झेड - अंगणवाडी पाठशाळेत ४७ मुले, यात ३२ मुली
  मुलींसाठी ग्रामपंचायत ४ झेड जिल्ह्यांत तिसऱ्या स्थानावर आहे. बदलाची मेख अंगणवाडी पाठशाळेतून दिसते. गावात प्रवेश करताच अंगणवाडी पाठशाळा १ बी आहे. या पाठशाळेत ४७ मुले व ३२ मुली आहेत. लोकांत जागरूकता इतकी आहे की भलेही ते शिकलेले नसतील; पण मुलांना मात्र जरूर शिकवताहेत. अंगणवाडी कार्यकर्ती नीलम शर्मा म्हणाल्या, अंगणवाडीतील अधिकांश मुले मजूर कुटुंबातील आहेत. पण हे सर्व इतके जागरूक आहेत की, सकाळी मुलांना शिकण्यासाठी पाठशाळेत सोडून जातात.
  एकेकाळी असे होते की, हे लोक मुलांनाही आपल्याबरोबर मजुरीसाठी घेऊन जात असत. पण आता या मजूर लोकांनी मनाशी पक्के केले आहे की, ते आपल्या मुलांना मजूर बनू देणार नाहीत. दोन मुलांची आई कमला हिने सांगितले की, आता माझाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचाच विचार बदलला आहे.
  ७१ आरबी - १००० मुलांवर २२२२ मुली
  ७१ आरबी -गाव ७१ आरबी येथे मुलगा-मुलगी भेद जणू संपलाच आहे. मुलींची संख्या एक हजार मुलांंवर २२२२ झालीय. गणवाडी केंद्र व शाळेतही मुली मुलांपेक्षा जास्त आहेत. सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रवीण राणी सांगतात की, शाळेत १२० विद्यार्थी आहे, ज्यात मुली ७० आहेत. गावातील हरजिंद्रकौर यांच्या ६ मुली आहेत. त्यांचे मानणे आहे की, मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. रजनी, परमेश्वरी यांचेही हेच मानणे आहे की, गावात बेटी बचाओ बेटी पढाओ अशी कोणतीही मोहीम वा घटना झाली की, या मुलींच्या आया त्वरित तेथे पोहोचून लोकांना प्रेरित करतात.
  पुढील स्लाईडवर वाचा, श्रीगंगानगरची ही सुखद स्थिती...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • news about Live Report for Rajasthan srinagar

Trending