Home | National | Rajasthan | News About Udaypur Four women Create the Wheel

एकाच कुटुंबातील चार सुनांनी तीन वर्षांमध्ये, छन्नी-फावड्याने खोदली 40 फूट खोल विहीर

शाहिद पठाण | Update - Mar 27, 2017, 03:32 PM IST

उदयपूरमधील लांबाहल्दू गाव. स्वातंत्र्यानंतर इथे एकही विहीर खोदण्यात आली नाही. इथे केवळ पावसाळ्यातच शिवार फुलते. येथील महिलांना उन्हाळ्यात अनेक मैल चालून पाणी आणावे लागते. पावसाळ्यात खड्डे खणून पाणी काढावे लागते. आता ही समस्या दूर झाली आहे. गावातील एकाच कुटुंबातील चार सुनांनी छन्नी-फावड्याच्या मदतीने ३ वर्षांत ४० फूट खोल, २० फूट व्यासाची विहीर खोदून पाणी काढले.

 • News About Udaypur Four women Create the Wheel
  उदयपूर- उदयपूरमधील लांबाहल्दू गाव. स्वातंत्र्यानंतर इथे एकही विहीर खोदण्यात आली नाही. इथे केवळ पावसाळ्यातच शिवार फुलते. येथील महिलांना उन्हाळ्यात अनेक मैल चालून पाणी आणावे लागते. पावसाळ्यात खड्डे खणून पाणी काढावे लागते. आता ही समस्या दूर झाली आहे. गावातील एकाच कुटुंबातील चार सुनांनी छन्नी-फावड्याच्या मदतीने ३ वर्षांत ४० फूट खोल, २० फूट व्यासाची विहीर खोदून पाणी काढले. आता जुगाड तंत्राने गाळ बाहेर काढला जात आहे.
  चार सुनांमधील सर्वात लहान मुन्नी म्हणाली, गावातील पुरुषांनी विहीर खोदण्यात उत्साह न दाखवल्यामुळे आम्ही २० फूट घेरात खोदकामास सुरुवात केली. ७ फूट खोदल्यानंतर दगड लागला. छन्नी-हातोड्याने दगड फोडले. दुसरी सून मुगली म्हणाली, आम्हाला २० बिघा जमीन परंतु, पाण्याअभावी शेत पडीक पडले आहे. १० वर्षांपासून हीच अवस्था आहे. यामुळे गुजरातला जाऊन मजुरी करावी लागते. कसेबसे रब्बीचे पीक मिळते. त्यातही ४ महिन्यांत १० हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत नाही.
  गावाची अनेक वर्षांपासून विहिरीची मागणी होती.अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर आम्ही चौघींनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. मोठी सून लाली म्हणाली, सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत खोदकाम करत होतो. पावसाळ्यात दगड घसरण्याच्या भीतीने काम बंद ठेवत होतो. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खोदकाम सुरू केले. होनकी म्हणाली, खोदकाम तर अजूनही सुरूच आहे.
  स्वच्छ पाणी आल्यानंतर सर्वात आधी उदयपूरच्या रस्त्यावरील प्रवाशांसाठी पाण्याची टाकी बांधणार आहोत. सुरुवातीचे तीन महिने आम्ही एकटेच काम करत होतो. मात्र, पती मजुरी करून परत आल्यानंतर मदत करू लागले. आता पूर्ण गाव पाणी पिऊ शकेल.
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • News About Udaypur Four women Create the Wheel
 • News About Udaypur Four women Create the Wheel

Trending