आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ दिवसांच्या कोवळ्या मुलीला जोधपूरमध्ये बसवला पेसमेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - जोधपूरच्या डॉक्टरांनी २० दिवसापूर्वी अवघ्या २२ दिवसाच्या मुलीला पेसमेकर बसवून वारंवार होणाऱ्या हार्ट ब्लॉकच्या समस्येपासून सुटका केली आहे. आता मुलीला पेसमेकर बसवून एक महिना १२ दिवस झाले. जोधपूरमध्ये प्रथमच इतक्या लहान बाळास पेसमेकर बसवण्यात आले. विशेष म्हणजे, मुलीला जिंवत राहण्यासाठी आवश्यक असलेले अॅपीकार्डियल पेसमेकर व्यवस्थापनाने नि:शुल्क उपलब्ध करुन दिले आहे. बाजारात या पेसमेकरची किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते.

जोधपूर येथील विनोदकुमार यांची पत्नी पूनमने २२ ऑक्टोबर रोजी एका मुलीस जन्म दिला. तिचे नाव पवित्रा ठेवण्यात आले. जन्मानंतर अवघ्या २२ दिवशी ती अचानक एक दोन वेळा बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी फीट्स येत असावेत असा अंदाज व्यक्त केला. तिच्या पालकांना पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉ. मनीष पारख यांच्याकडे पाठवले. प्रदीर्घ तपासणीनंतर तिला हृदयासंबंधीचा आजार आल्याचे निदर्शनास आले. यावर कार्डिऑलिजिस्ट डॉ. पवन सारडा यांनी मुलींच्या हृदयाशी संबंधित इको, हॉल्टरसह इतर तपासण्या केल्या. यात हार्ट ब्लॉक होण्याची समस्या आढळली. नवजात असल्याने पोटाच्या कातडीत पेसमेकर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हॉर्ट ब्लॉकमुळे बेशुद्ध : मुलीच्या हृदयाच्या तपासणीत डॉ. सारडा व डॉ. पारख यांनी हॉल्टर टेस्ट केली. त्यात असे दिसले की, बेशुद्ध होण्याच्या १० ते २० सेकंद दरम्यान हृदय पूर्णपणे ब्लॉक होत असे. सर्व तपासणीनंतर तिला पेसमेकर बसवण्याचे ठरले. यासाठी सव्वा लाख रुपये खर्च येणार होता. त्यासाठी तिच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. डॉक्टरांच्या विनंतीवरुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमिलाल भाट व अधीक्षक डॉ. सुनील गर्ग यांनी पेसमेकर मोफत बसवण्यास त्वरित मंजुरी दिली.

मुलगी १५ वर्षांची झाल्यानंतर पेसमेकरचीही जागा बदलेल
वयस्कांसाठी पेसमेकर कॉलर - बॉनच्या खाली बसवले जाते. परंतु ती नवजात असल्याने पोटाच्या खाली एका भागात पॉकेट तयार केले गेले. त्यात पेसमेकर बसवले. मुलीला दिवसातून चार ते पाच वेळा पेसमेकरची गरज पडेल. यातील बॅटरी १५ वर्षे चालते. त्यानंतर पेसमेकर कॉलर बॉनच्या खाली बसवला जाईल.
बातम्या आणखी आहेत...