आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्री पर्रिकर म्‍हणाले - सहनशीलता संपली, वर्षभरात दिसेल परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर शनिवारी जयपूरमध्‍ये होते. पटाणकोट हल्‍ल्याच्‍या पार्श्‍वभूमीवर ते म्‍हणाले की, देशाची सहनशीलता आता संपली आहे. आता आम्‍ही सहन करू शकत नाही. संरक्षण मंत्री म्‍हणून मी पण आता हे सहन करू शकत नाही.
पर्रिकर यांचे आश्चर्यकारक वक्‍तव्‍य..
- पर्रिकर म्‍हणाले, शत्रुंचा कसा खात्‍मा करावा, या पेक्षा ते कोणत्‍या मार्गाने देशात येतात याचा विचार करावा लागेल.
- आता दहशतवादी हल्‍ले सहन करण्‍याची वेळही संपली आहे.
- पर्रिकर म्‍हणाले, पाकची एक टीम पठाणकोटला येऊन चौकशी करणार आहे. हे आपल्‍याला माहित नाही. मात्र आपल्‍या परवानगी शिवाय कोणी कसे येऊ शकेल, असे ते म्‍हणाले.
आयएसआयच्‍या निशाण्‍यावर आहे आर्मी
-
पर्रिकर म्‍हणाले- जसे दिसते तसे नाही, त्‍यांच्‍यापेक्षा आपले नेटवर्क मोठे आहे. परिणामकारक आहे. त्‍यांच्‍या नेटवर्कचा जास्‍त परिणाम आपल्‍यावर होत नाही. पण सुरक्षेच्‍या दृष्‍टीने प्रत्‍येक गोष्‍ट सांगता येणार नाही.
- पर्रिकर म्‍हणाले- सोशल मीडियावर पाकिस्तानच्‍या किंवा इतर दहशतवादी संघटनांच्‍या माध्‍यमातून कॅम्‍पेन राबवले जात आहे. हेरगिरीसाठी त्‍यांनी नवीन धोरण तयार केले आहे.
- ते म्‍हणाले- फेसबुकमुळे कोणते धोके आहेत, आपण त्‍यांना कसे थांबवू शकतो. यावर सध्‍या काम सुरू आहे.
केव्‍हा झाला पठाणकोट हल्‍ला, या प्रकरणात आतापर्यंत काय झाले ?
- 2 जानेवारीला सकाळी 6 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्‍ला केला. या घटनेत 7 जवान शहीद झाले.
- 36 तासानंतर एनकाउंटर आणि तीन दिवस कॉम्बिंग ऑपरेशन चालले.
- या हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा मुख्य मौलाना मसूद अजहर आहे.
- अजहरला 1999 मध्‍ये कंधार प्लेन हायजॅक केसमध्‍ये. अपहरण केलेल्‍या प्रवाशांच्‍या बदल्‍यात सोडण्‍यात आले होते.
-दहशतवाद्यांचे त्‍याच्‍या हँडलरसोबत झालेल्‍या संवादाचे कॉल डिटेल्‍स आणि पाकमध्‍ये बनलेले काही साहित्‍य पूरावा म्‍हणून भारताने शेजारील देशांना पाठवले आहे.
- पाक मीडियाचा दावा आहे की, मसूद अजहरला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने याला नकार दिला आहे.
- दरम्यान, 15 जानेवारीला भारत-पाकिस्तान परराष्ट्र सचिव पातळीवर होणारी चर्चा पुढे ढकलली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...