Home | National | Rajasthan | Pakistani intelligence agency ISI agent arrested from Rajasthan

राजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजंट पोलिसांच्या ताब्यात

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 21, 2017, 05:05 AM IST

राजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संशयित हस्तकाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांनी जैसलमेरच्या कुंजरली गावातून ५५ वर्षांच्या हाजी खानला ताब्यात घेत संवेदनशील माहिती असलेली काही कागदपत्रेही त्याच्याकडून जप्त केली. अनेक गाेपनीय माहिती आयएसआयपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यावर आरोप आहे.

  • Pakistani intelligence agency ISI agent arrested from Rajasthan
    जयपूर: राजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संशयित हस्तकाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांनी जैसलमेरच्या कुंजरली गावातून ५५ वर्षांच्या हाजी खानला ताब्यात घेत संवेदनशील माहिती असलेली काही कागदपत्रेही त्याच्याकडून जप्त केली. अनेक गाेपनीय माहिती आयएसआयपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. जोधपूरमध्ये खानची कसून चौकशी केली जात आहे. खानला याआधीही अटक करण्यात आली होती. मात्र पुराव्यांअभावी त्याची सुटका करण्यात आली होती. पाकिस्तानात त्याच्या आजोबांचे घर असल्यामुळे तो तेथे नियमितपणे येत-जात होता.

Trending