आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजारामुळे आले मरण, राणीच्‍या डोळ्यांसमोर रचले \'बादल\'चे सरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- चार वर्षापासून गुलाबबाग प्राणीसंग्रालयात बिबट्याची फक्‍त एक जोडी पाहायला मिळत होती. आता मात्र ही जोडी पर्यटकांना पाहायला मिळणार नाही. चार वर्षापासून सोबत असलेला नर बिबट्या ' बादल' त्‍याच्‍या ' राणी' नावाच्‍या 'मादा' बिबट्याला आजारामुळे सोडून गेला.
'बादल'च्‍या अकाली जाण्‍यामुळे गुलाबबाग प्राणीसंग्रालयातील 'राणी' एकटी पडली आहे. रविवारी अचानक ताप चढल्‍यामुळे 'बादल' आजारी पडला. डॉक्‍टरांनी बादलला वाचवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र ताप 104 डिग्री सेल्‍शीयस वाढल्‍यामुळे बादलला वाचवता आले नाही. आपला जोडीदार सोडून गेल्‍यामुळे 'राणी' उदास दिसत होती. दोघांची चार वर्षाची सोबत आता कायमची संपली.
डॉ. ललित जोशी यांनी सांगितले की, श्वास नलिकेत इजा झाल्‍यामुळे फुफ्फूस खराब झाले. श्वास घेण्‍यासाठी बादलला त्रास झाला. श्वास कोंडल्‍यामुळे बिबट्याचा मृत्‍यू झाला असल्‍याचे डॉ. ललित यांनी सांगितले.
'बादल' चा मृत्‍यू आणि सुरक्षेचा प्रश्‍न-
बादलचा मृत्‍युमुळे गुलाबबाग प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि त्‍यांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. डॉक्‍टरांनी सांगितले की योग्‍यवेळी उपचार केले असते तर ' बादल'चा मृत्‍यू झाला नसता.
पुढील स्‍लाईडवर पाहा बादल आणि राणीची छायाचित्रे...