आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बालकाला जैन मंदिरासमोर ठेवून निघून गेले पालक, सोबत ठेवले 40 हजार रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- या बालकाला हृदयाशी संबंधित काही आजार असून उपचारांची तातडीची गरज आहे. त्याचा पालकांची याची नेमकी माहिती होती. त्यामुळे त्यांनी या बालकाला जैन मंदिरासमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी या बालकासोबत काही कपडे, डायपर आणि रोख 40 हजार रुपये ठेवण्यात आले होते.
सोमवारी सकाळी जैन मंदिरात भावीक आले तेव्हा त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलाला दत्तक घेण्याची इच्छा अनेक लोकांनी व्यक्त केली आहे. या बालकाचे वजन 3 किलो 200 ग्रॅम आहेत. उपचार करुन बालकाला वाचविणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या मंदिराजवळ असलेल्या नर्सिंग होम्समध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. पण त्यातून काही ठोस पुरावा हाती आलेला नाही. शिवाय मंदिराला सीसीटीव्ही नसल्याने बालकाच्या पालकांचा शोध लागणे अवघड आहे. पण बालकाला मंदिरासमोर ठेवताना पालकांनी 40 हजार रुपये का ठेवले असावेत, हा एक मोठा प्रश्न आहे.
कदाचित पालकांकडे उपचारासाठी एवढेच पैसे असावेत. डॉक्टरांनी त्यांना जास्त पैसे आणण्यास सांगितले असावे. त्यामुळे बालकाचा दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला या पैशांमध्ये आणखी काही पैसे टाकून उपचार करता यावेत, असा कयास पोलिसांनी लावला आहे.