आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Cut Legs And Murdered A Woman In Rajasthan

PHOTOS: महिलेचे तोडले पाय, 2000 ग्रामस्थांचा हल्ला, तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भींडर/उदयपूर (राजस्थान)- भींडरमध्ये एका महिलेचे पाय तोडून हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चांदीचे कडे चोरुन हत्या केल्याचा संशय एका कुटुंबावर व्यक्त करण्यात आला आहे. याचा सूड उगवण्यासाठी तब्बल 2000 ग्रामस्थांनी एका समाजाच्या लोकांवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर संशय असलेला एका इसम, त्याची मुलगी यांच्यासह तिघांना एका झाडाला बांधण्यात आले. त्यांच्या घरांची राखरांगोळी करण्यात आली. त्यांना जिवंत जाळण्याचा या ग्रामस्थांचा हेतू होता. यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पळून गेले.
असे आहे हे प्रकरण
चौल फला येथील रहिवासी आणि उदयलाल रावत यांची पत्नी मीराचे दोन्ही पाय तोडून हत्या करण्यात आली. तिचे पाय एका खड्ड्यात तर मृतदेह एका विहिरीत सापडला. शुक्रवारी सायंकाळपासून मीरा बेपत्ता होती. उदयलाल आणि तिची नणद शांता यांनी रात्रभर तिला शोधले. सकाळी त्यांना एका खड्ड्यात पायाचे पंजे सापडले. त्यानंतर चार तासांनी विहिरीतून तिचा मृतदेह काढण्यात आला. तिच्या कुटुंबीयांचा संशय त्यांच्या घरांपासून काही अंतरावर राहत असलेल्या कालबोलिया समाजाच्या लोकांवर होता. त्यामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण वस्तीने या समाजाच्या घरांवर हल्ला चढवला. प्रचंड नासधुस केली. एक व्यक्ती, त्याची मुलगी यांच्यासह तिघांना झाडाले बांधले. त्यांना जिवंत जाळण्याचा कट ग्रामस्थांनी रचला होता.
यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांना रोखले. त्यावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली. जवळपास तीन वेळा झालेल्या दगडफेकीत 30 पेक्षा जास्त जवान आणि अधिकारी जखमी झाले. परंतु, पोलिस तिघांना वाचविण्यात आणि मृतदेह भींडर येथे आणण्यात यशस्वी झाले. त्यानंतर शेकडो ग्रामस्थ येथेही पोहोचले. त्यांनी दगडफेक करीत पोलिसांच्या वाहनाला आग लावली. त्यानंतर इतरही वाहनांचे नुकसान केले. पोलिसांनी लाठिमार करीत जमावाला नियंत्रित केले. यावेळी 40 ग्रामस्थांना अटक करण्यात आली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचे फोटो....