आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची वास्तवदर्शी फेररचना हवी : पंतप्रधान मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - पॅरिसमधील आगामी क्लायमेट चेंज संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची वास्तवदर्शी फेररचना व्हायला हवी, अशी मागणी केली. अशी रचना झाल्यानंतरच त्यातून प्रभावी आणि चिरंतन अशा स्वरूपाचे परिणाम दिसतील, असे मोदींनी म्हटले आहे. १४ देशांच्या फिपीक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मोदी शुक्रवारी येथे बोलत होते.

सध्या नवे युग आहे. जागतिक आव्हाने मात्र सर्वांसाठी समान आहेत. परंतु अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सागरी क्षेत्रांचा उपयोग करून घेता येऊ शकतो. त्यांचा चिरंतन वापर झाल्यास त्यातून समृद्धी येऊ शकते. त्याचबरोबर मासेमारीच्या पलिकडे जाऊन स्वच्छ ऊर्जा, नवीन आैषधी आणि अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर देखील विचार होणे गरजेचे आहे. फिपीक अर्थात फोरम ऑफ इंडिया पॅसिफिक आयलँड कन्ट्रीजच्या व्यासपीठावरून मोदी यांनी संघटनेच्या व्यापारी कार्यालयाच्या स्थापनेची घोषणा केली. हे कार्यालय दिल्लीतील इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या इमारतीमध्ये असेल. तत्पूर्वी सकाळी १४ देशांच्या प्रमुखांचे येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

१४ राष्ट्रध्वज घेऊन शालेय विद्यार्थी संगनेर विमानतळावर सहभागी झाले होते.
३ राष्ट्राध्यक्ष, ५ पंतप्रधान, अन्य देशांचे मंत्रीही सहभागी
छोटे देश, मोठ्या अपेक्षा
संरक्षण, तेल-गॅस उत्खनन, कृषी, अन्न प्रक्रिया, मत्स्य, सौर, टेलिमेडिसिन, अंतराळ विज्ञान, क्लायमेट चेंज इत्यादी मुद्द्यांवर करार अपेक्षित. त्या माध्यमातून भारतीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध १४ देशांना घ्या जाणून
पालाऊ : पहिला अण्वस्त्रमुक्त देश
-टोमी रेमेनगसाआे, राष्ट्राध्यक्ष.
कुक आयलँड्स :पर्यटनातून ६८ टक्के उत्पन्न
-नंडी ग्लासी, आरोग्यमंत्री
निऊ : २६० चौरस किमीच्या देशात वाय-फाय मोफत.
-टोके तालांगी, पंतप्रधान.
मायक्रोनेशिया : २६ लाख चौरस किमीचा सागर
-टी योशिवो, उपराष्ट्राध्यक्ष.

पापुआ न्यू गिनिआ : संघटनेतील सर्वात मोठा देश
-पीटर आेनील, पंतप्रधान.
टुवालू : इंटरनेट डोमेन विकून २२ लाख डॉलरची कमाई. -एनेल, पंतप्रधान.
किरिबाटी : वातावरणामुळे संपूर्ण देश बुडण्याची भीती.
-मिस टेकाआे लुता, सल्लागार.
टोंगा : येथे मूलभूत शिक्षण मोफत आणि अनिवार्य.-सेमिसी टावलांगी, मंत्री.
मार्शल आयलँड : अमेरिकेने ६७ अणुचाचण्या घेतल्या.
-क्रिस्टोफर, राष्ट्राध्यक्ष.
नाउरू : कर चोरांसाठी स्वर्ग, दिवाळखोरीकडे
-बॅरन वॉका, राष्ट्राध्यक्ष.
समोआ : टाइम झोन बदलण्यासाठी २०११ च्या कॅलेंडरमधून ३० डिसेंबर हटवले होते.
-तुईलेपा, पंतप्रधान.
वानुआतू : देशात कोणताही आयकर नाही.
-सतो किलमॅन, पंतप्रधान.
फिजी : ४० टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची.
-फ्रँक बॅनीमारामा, पंतप्रधान.
सोलोमन आयलँड्स : मोठ्या खनिजांचा खजिना असलेला देश.
-डग्लस अॅट, उपपंतप्रधान.