आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shameful: पोलिसाने विद्यार्थीनीचा सर्वांसमोर केला विनयभंग, फोटो झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- समाजकल्याण विभागाकडून चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि स्कॉलरशिप यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आयोजित केला होता. यावेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांना लाठिमार करावा लागला. यावेळी काही पोलिसांनी विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. पोलिस कारवाईमुळे काही विद्यार्थीनी चक्कर येऊन पडल्याचेही वृत्त आहे.
स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) नेतृत्वात विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी लाठिमार केला. यावेळी काही पोलिसांनी काही विद्यार्थीनींना चुकीची वागणूक दिली. त्यांचा विनयभंग केला.
दरम्यान, पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना अटक केली असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठिमारमध्ये काही विद्यार्थीनींना गंभीर दुखापती झाल्या. त्यातील काही जागेवरच बेशुद्ध होऊन कोसळल्या. त्यानंतर त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही पोलिसही यात जखमी झाल्याचे समजते. एका पोलिसाच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचेही वृत्त आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पोलिसांनी कसा केला लाठिचार्ज... विद्यार्थीनींना कसे हटविले....
बातम्या आणखी आहेत...