जयपूर - येथील पोलिस वसाहतीमधील चौथ्या मजल्यावरून रीनू ही गर्भवती महिला अचानक पडली. ती कपडे वाळत टाकत होती. तेव्हा अचानक तिचा तोल गेला. खाली उभ्या असलेल्या स्कुटरवर पडल्याने सुदैवाने तिचे प्राण वाचले आहेत. तिचे हात पाच फॅक्चर झाले आहेत. मणक्याचे हाडही मोडले आहे. ती चार महिन्याची गर्भवती असल्याने या घटनेने परिसरातील अनेकांना धक्का दिला.
पाऊण तासानंतर पोहोचली रूग्णवाहिका
क्वॉर्टनमध्ये राहत असलेल्या कॉन्स्टेबल एकता यांनी 108 या रूग्नवाहिकेला फोन केला. मात्र त्याच्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता. तब्बल 45 मिनीट उशीराने रूग्णवाहिका पोहोचल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला.
रुग्णवाहिकेला नाही मिळाला पत्ता
आधी कॉलरचा फोन आला. सात ते आठ मिनीटांनी आम्ही पुन्हा कंट्रोल रूममधून कॉलरला फोन केला. पण त्यांचा फोन व्यस्त असल्यामुळे आम्हाला पत्ता मिळाला नाही. 30 मिनीटानंतर पुन्हा आम्ही कॉलरला फोन लावला तेव्हा पत्ता व परिस्थिती लक्षात आली.
-प्रियंका कपूर, सल्लागार 108 रुग्णवाहिका, जयपूर
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो..