आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरली "राजकुमारी", ठिय्या आंदोलनात घेतला भाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- जयपूर राजघराण्याची माजी राजकुमारी दिया कुमारी जेव्हा एका आंदोलनात सहभागी झाल्या तेव्हा उपस्थितांना मोठा धक्का बसला. भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर राजकुमारी दिया कुमारी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास सुरवात केली आहे.
यावेळी मोतीडूंगरी येथील डायमंड हिल्सला वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात दिया कुमारी सहभागी झाल्या होत्या. सुमारे तासभर दिया कुमारी यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आपला लढा आणखी तीव्र करण्यावर भर दिला.
यापूर्वी माजी राजमाता गायत्री देवी यांचा नातू सिध्दांतसिंह शांती मोर्चात सहभागी झाला होता. सिद्धांत विजितसिंह यांचा मुलगा आहे. तर दिया कुमारी राजमाता गायत्री देवी यांची नात आहे.
दिया कुमारी यांनी कसे ठिय्या आंदोलन केले, बघा पुढील स्लाईडवर