आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथुन गेली आजम खानची स्‍वारी, गंगाजलाने धुतले रस्‍ते...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदनगंज- उत्‍तर प्रदेशचे शहर विकास मंत्री अजम खान सोमवारी किशनगडच्‍या दौ-यावर गेले असता, त्‍यांना हिन्‍दुत्‍ववादी संघटनांचा रोष पत्‍कारावा लागला. खाजगी कामानिमित्‍त आलेल्‍या अजम खॉन यांच्‍या गाडीवर काळे झेंडे फेकून निषेध करण्‍यात आला.
पाण्‍याने धूतले रस्‍ते
याबाबत मिळालेल्‍या माहिती नुसार खान यांचा ताफा दुपारी 12 :10 वाजता मार्बल यरीयात टूंकडा रो्डवर एका खाजकी कामासाठी दाखल झाला. याची माहिती हिंदुत्‍ववादी संघटनेला मिळाल्‍यानंतर या संघटनेचे कार्यकर्ते मार्बल यरीयात जाऊन धडकले. विरों की धरती पर गद्दारोका का क्‍या काम' अशा प्रकारच्‍या घोषणा कार्यकर्त्‍यांनी दिल्‍या. आजमल खान रस्‍त्यावरून गेले तो रस्‍ता गंगेच्‍या पाण्‍याने कार्यकर्त्‍यानीं धुऊन काढला.
पोलीसांच्‍या समोर नारे-बाजी:
या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर मदनगंज पोलीस ठाण्‍याचे पोलीस घटनास्‍थळी पहोचले. पोलीस पोहचल्‍यानंतरही कार्यकर्त्‍यांची नारे-बाजी सुरू होती.
आजम खान यांना विरोध का -
मुजफ्फरनगरमध्‍ये झालेल्‍या जातीय दगंलीला राज्‍य सरकार जबाबदार असून अजम खान यांच्‍या इशा-यावर इथली दंगल घडवण्‍यात आली असल्‍याचा अरोप शिव सेना हिंदुस्‍तानचे जिल्‍हाध्‍यक्ष गोपाल शर्मा, अखिल भारतीय हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष जितेंद्र सिंह व हिंदूत्‍ववादी संघटनेने केला आहे.
2013 मधील अशाप्रकारची एक घटना -
या प्रकाची घटना 2013 या वर्षात पाकिस्‍तानचे पतंप्रधान राजा परवेज अशरफ हे आजमेरच्‍या दै-यावर आले होते. याच वर्षी पाकिस्‍तानच्‍या सैन्‍यांनी भारतीय जवानांची हत्‍या केल्‍यामुळे देशभरामध्‍ये तनावाचे वातावरण निर्माण झाले हाते. या घटनेचा निशेध म्‍हणून अशरफ आलेले सर्व मार्ग पाण्‍यानी धुऊन काढण्‍यात आले होते.
का आले होते आजम खान -
रामपुरमध्‍ये बांधन्‍यात आलेल्‍या कॉलेजसाठी मार्बल खरेदी करण्‍यासाठी आजम खान अजमेरमध्‍ये आले होते.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि पाहा छायाचित्रे....